Skip to content

Solar Eclipse | ‘या’ दिवशी होणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण!

Solar Eclipse

Solar Eclipse | जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे असलेली सूर्याची प्रतिमा काही काळासाठी पूर्णपणे झाकली जाते आणि या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हटले जाते. यावेळी, आकाशात ज्या ठिकाणी सावली पडते त्या ठिकाणी सूर्य अर्धा किंवा पूर्ण झाकलेला दिसत असतो. चला तर मग यावर्षीच्या सूर्यग्रहणाबद्दल माहीती घेऊया.

Big Breaking | आयोग-इडीसुद्धा ‘यांचे’च नोकर; ठाकरेंनी सरकारला घेरलं

Solar Eclipse | ग्रहण बद्दल पौराणिक कथा काय

पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले आणि ज्यातून हलहल हे विष प्रथम बाहेर पडले. जे संपूर्ण जगासाठी मृत्यू ठरले. तेव्हा महाकाल भगवान माहादेवाने ते विष पिले म्हणुन आजही त्यांना नीलकंठ म्हटले जाते. समुद्र मंथनाचा काळ जसजसा वाढत गेला तशा अनेक मौल्यवान वस्तू बाहेर पडल्या. या क्रमात भगवान धन्वंतरी हातात अमृत पात्र घेऊन प्रकट झाले आणि ते अमृत पात्र मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये लढाई सुरू झाली.

देवांना सर्व अमृत मिळावे अशी इच्छा असताना, जेणेकरून राक्षस अमर होऊ नयेत हा त्यामागील मुळ हेतू होता. अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी भगवान विष्णू हे मोहिनीच्या रूपात आले आणि मग राक्षसांनी अमृत वाटण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आधी देवांना अमृत मिळणार आणि मग दानवांना असा फतवा काढताच राक्षसांनी हे मान्य केले. एका रांगेत देव बसले आणि दानव दुसऱ्या रांगेत. मोहिनीचे रूप धारण करून भगवान विष्णू देवतांना अमृत पाजू लागले होते.

Uddhav Thackrey | …अन् ठाकरेंच्या परिषदेत लावला ‘तो’ व्हिडिओ

Solar Eclipse | राक्षसाने फसवण्याचा प्रयत्न केला

याचवेळी एका राक्षसाला वाटले की, देव आपला विश्वासघात करणार आहेत. तो मायावी राक्षस देवाचे रूप धारण करून देवांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि तेव्हा सूर्य देव आणि चंद्र देव यांना त्या राक्षसाचे रहस्य कळले. भगवान विष्णू जेव्हा त्या राक्षसाला अमृत पाजत होते तेव्हा सूर्य आणि चंद्राने भगवान विष्णूला त्या राक्षसाबद्दल सांगितले. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने त्या राक्षसाचे डोके आपल्या शरीरापासून वेगळे केले.

त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब चाखले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झालाच नाही. त्याचे डोके आणि धड वेगवेगळे वाचले. त्या राक्षसाचे डोके आणि धड यांना राहू आणि केतू म्हणतात. नऊ ग्रहांपैकी राहू आणि केतूला छद्म ग्रहांचा दर्जा दिला आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण राहू आणि केतूमुळे होते. सूर्यग्रहण अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते.

Uddhav Thackrey | लवादाला मोतीबिंदू झाला म्हणून पुरावे दिसले नाही; पत्रकार परिषदेत राऊत गरजले

2024 सालातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार असून हे ग्रहण रात्री 09:12 ते मध्यरात्री 01:25 पर्यंत राहणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 25 मिनिटे असणार आहे. ८ एप्रिल रोजी होणारे हे ग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात होईल.

तसेच दुसरे सूर्यग्रहण वर्षाच्या शेवटी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी होणार असून, जे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर असतो आणि सूर्यापेक्षा लहान दिसतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होते. अशा स्थितीत सूर्याचा फक्त मध्य भाग चंद्राने झाकलेला असतो आणि सूर्याचे बाह्य वर्तुळ आगीच्या वलयासारखे दिसते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!