Bharati Pawar | दिंडोरी लोकसभा मतदार संघात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे, एकीकडे महाविकास आघाडीत फूट पडली असून, जे पी गावीत यांनी वेगळा मार्ग निवडला. तर, दुसरीकडे भारती पवारांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारती पवार यांनी धमकीचे फोन केले, टक्केवारी मागितल्याचे गंभीर आरोप भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी केले आहे. भारती पवारांवरील नाराजीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यावेळी त्यांनी हे आरोप केले. (Bharati Pawar)
फोन लागतच नाही, नाहीतर पीए उडवाउडवीची उत्तर देतात
गेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन भारती पवारांना दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवले. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने त्यांना मंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे आपला लोकप्रतिनिधी असल्याने आपली कामे मार्गी लागली पाहिजे, अशी भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते.
परंतु, गेल्या पाच वर्षात आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आले. कारण कार्यकर्ते जेव्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा एकतर त्यांचा फोन कधी लागतच नाही. किंवा त्यांचे पीए फोन उचलतात आणि ताई दिल्लीला आहे, केरळला आहे, परदेशात आहेत, अशी उडवाउडवीची उत्तर देतात. लोकं त्यांच्याकडे जाताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात.(Bharati Pawar)
Bharati Pawar | भाजपा खासदार डॉ. भारती पवार यांना गावबंदी
Bharati Pawar | पीए लोकांकडून टक्केवारीची मागणी
मात्र, त्यांनी गेल्या पाच वर्षात कधीही कार्यकर्त्यांच्या किंवा लोकांच्या कामांसाठी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला नाही. त्यामुळे आम्हाला त्याठिकाणी लोकांसमोर अपमानित आणि नाउमेद व्हावे लागले. मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष, उपसरपंच आहे. आम्ही निवडणूक काळात तुमची कामं करतो आणि असे असतानाही माझ्या गावातीलही विकासकामेही देताना त्यांच्या पीए लोकांकडून टक्केवारीची मागणी केली जाते. हे आम्ही निमूटपणे गेली पाच वर्ष सहन केले.(Bharati Pawar)
Bharti Pawar | भारती पवारांना नेटकऱ्यांचा कुठे विरोध तर कुठे पाठिंबा..?
तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायचीय का..?
पाच दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. त्यावेळी आम्ही मागणी केली की, भारती पवारांनी आम्हाला पाच वर्षात जी वागणूक दिली. त्याबाबत आम्हाला त्यांच्यासोबत बोलायचे आहे. त्या बैठकीत मी विरोधात बोललो, म्हणून मला रात्री साडे अकरा वाजता त्यांचा फोन आला आणि माझ्याशी अतिशय उर्मटपणे अगदी धमकी वजा इशारा देत त्या बोलल्या, “तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायचीय का..?, तुला कोणी शिकवतंय का..?,माझी तक्रार थेट जेपी नड्डांकडे कर, माझी उमेदवारी रद्द करून आण.” अशा प्रकारे त्या बोलत होत्या. हे माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता सहन करू शकत नाही. त्यामुळे या वागणुकीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे योगेश बर्डे म्हणाले. (Bharati Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम