इगतपुरी : आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी टाकेद गटातील मांजरगाव येथे सुमारे ५० कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत.
टाकेद गटातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याची ग्वाही आमदार माणिकराव कोकाटे यांनी या भागातील जनतेला दिली होती.त्यानुसार दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्त्यांची व घरापर्यंत स्वच्छ पाणी मिळण्यासाठी नळपाणीपुरवठा योजनांच्या कामांना आरंभ होणार आहे.आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत आदिवासी बांधवांना विकास कामांची भेट यानिमित्ताने मिळणार असल्याची माहिती आमदार कोकाटे यांचे स्वीय सहायक संजय डावरे यांनी दिली.
११ कोटी ८२ लाखातून आदिवासी उपाय योजनेअंतर्गत रस्ते व पूल,२१ कोटी ४५ लाखातून आंबेवाडीसह ८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,९ कोटी ४५ लाखांतून खेड वाडी वस्ती प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,४ कोटी ५० लाख रुपयांतुन जनसुविधा,आमदार निधी,जिल्हा क्रीडा निधीतील कामे, ३ कोटी ४० लाखातून नवीन ट्रान्सफॉर्मर व वाड्यावस्त्यांवर वीज कनेक्शन देणे या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव येथे ८ तारखेला सायंकाळी ५ वाजता आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,निष्ठावान कार्यकर्ते प्रत्येक गाव परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
“भांम धरणाचा कायमस्वरूपी उदभव घेऊन टाकेद गटातीतील मांजरगावसह नऊ गावे नऊ वाड्या वस्त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून कायमचा निकाली लागणार आहे.विधानसभा निवडणुकीत टाकेद गटातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी विकास कामांच्या माध्यमातून सार्थकी लावण्यासाठी कटिबद्ध आहे.”
– अँड माणिकराव कोकाटे आमदार सिन्नर विधानसभा
“टाकेद गटातील आदिवासी वाड्या वस्त्यांमधील भीषण पाणीटंचाई लक्ष्यात घेता हा तीव्र प्रश्न सोडविण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक गावच्या सरपंच कार्यकर्ता यांच्यासह काही महिन्यांपूर्वी नाशिक जीवन प्राधिकरण कार्यालयात अधिकाऱ्यांची थेट बैठक बोलावली होती या बैठकीत टाकेद गटातील मांजरगाव, आंबेवाडी, इंदोरे, खडकेद, वासाळी, सोनोशी, ठोकळवाडी, शिरेवाडी आदी गावांसह तेथील वाड्यांचा ऐरणीवर असलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागावा म्हणून भाम धरणाचा कायमस्वरूपी उद्धभव घेऊन ही नऊ गावे नऊ वाड्या वस्त्यांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता अखेर हा प्रश्न आज मार्गी लागला असून या कामाचे आज भूमिपूजन होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ नागरिकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.”
– राम शिंदे , सामाजिक कार्यकर्ते टाकेद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम