सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | शहरासह संपूर्ण तालुक्यात पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील जनतेला दुष्काळाशी सामना करावा लागला होता. यामुळे पोळ्या सणावर देखील दुष्काळाचे सावट दिसून आले होते.
Deola | देवळा नगरपंचायतीची पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध
यावर्षी मात्र पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने ऑगस्ट अखेर तालुक्यातील बहुतांश छोटे मोठे पाझर, तलाव ओहरफ्लो झाल्याने नदी नाले दुथडी भरून वाहतांना दिसत आहेत. यामुळे पाणी टंचाईचे संकट दूर झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याने सोमवार दि. २ रोजी संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांनी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
Deola | सुराणा पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी; वाजगांव आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना गाद्या वाटप
Deola | पोळा सणानिमित्त बाजारपेठांत गर्दी
पोळा सणाच्या आठ दिवस अगोदरच खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राज्याला सजून सायंकाळी आपापल्या गावातील मारुती मंदिराभोती बैलांना फेऱ्या मारून महिला वर्गाने औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घातला. (Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम