Badalapur Case | बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला असून संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रांझिस्ट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेत एपीआय निलेश मोरे पोलीसव्हॅन मधून ट्रांझिस्ट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी शिंदेवर गोळ्या झाडल्या. यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या चकमकीत पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत.
“पोलीस खोटं बोलत आहेत..”- आरोपीच्या कुटुंबिंयाचा आरोप
या घटनेनंतर आता सर्वत्र खळबळ उडाली असून यावर अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पोलिस खोट बोलत असून माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकले आहे. मी त्याला नुकताच जाऊन भेटून आलो होतो. ज्याला साधी पिचकारी वापरता येत नाही, तो पोलिसांची बंदूक कुठून चालवेल. तो कधी फटाकेही वाजवत नव्हता. याबाबत पोलिसांनी आम्हाला काहीही कळवले नाही. मी हे सर्व टीव्हीवर पाहिले तेव्हा मला ही घटना समजली.” अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या वडिलांनी दिली आहे.
Badlapur Case | २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’..!; विरोधकांकडून बंदची हाक
महिनाभरापूर्वी घडली होती घटना
बदलापूर येथे 13 ऑगस्ट 2024 रोजी दोन शाळकरी मुलींवर लैंगिक छळ झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला होता. लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर हजारोंचा जमाव लोकल ट्रेनच्या ट्रॅक्टर उतरला होता. त्यानंतर दगडफेक देखील झाली होती. या घटनेमुळे संतप्त जमावाने 20 ऑगस्ट रोजी आधी शाळेची तोडफोड केली आणि नंतर बदलापूर स्टेशनवर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निदर्शने देखील केली. या आंदोलनामुळे लोकल गाड्यांची वाहतूक जवळजवळ दहा तासांहून अधिक काळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी लाठी चार्ज करून पोलिसांनी रेल्वे ट्रॅक रिकामा केला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम