Badlapur Case | २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’..!; विरोधकांकडून बंदची हाक

0
79
Badlapur Case
Badlapur Case

Badalapur Case | बदलापूर येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली गेली. त्याचबरोबर महिला सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिले. बदलापूर येथील घटना ताजी असतानाच राज्यातील इतर भागातून महिला अत्याचाराच्या घटना हळूहळू समोर येण्यास सुरुवात झाली. या संपूर्ण परिस्थितीमुळे विरोधी पक्ष संताप व्यक्त करीत आहेत. या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या या प्रकरणांना गांभीर्याने मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीअंती त्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड, नसीम खान व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील हजेरी लावली होती.(Badlapur Case)

Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

“महाराष्ट्र मनाने अस्वस्थ” – संजय राऊत

“आम्ही कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा केली नाही. महाराष्ट्र मनाने अस्वस्थ झाला आहे, पेटून उठला आहे. तेव्हा आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था यावरच चर्चा केली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावे यासाठी आम्ही 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद ची हाक देत आहोत. तेव्हा या हाकेला महाराष्ट्रातील जनतेने योग्य प्रतिसाद द्यावा” बैठकीनंतर समाज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले.

Badlapur Case | लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या; शाळेत तीन वर्षांच्या चिमूकल्यांवर अत्याचार

Badlapur Case |  बैठकीनंतर नाना पाटोळे यांचे वक्तव्य

त्याचबरोबर, ” बदलापूर मधील घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. आज महाराष्ट्रातील मुली सुरक्षित नसून घडलेली घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. शाळेची संस्था भाजपची आणि आरएसएसची आहे त्यामुळे सरकारने बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केला. महायुतीच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पत्रकाराशी बोलताना अपशब्द वापरले गेले. या सगळ्या गोष्टी असूनही आम्हाला यात राजकारण करायचे नाही.

दरवेळी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या गोष्टी केल्या जात आहेत. याचा निषेध करत आम्ही 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत. यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व सामील होणार आहेत तेव्हा या अकार्यक्षम सरकारला समाज आरसा दाखवून देणार आहे.” असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळेस केले.(Badlapur Case)

“राज्यामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बाबतीत व महायुती सरकारच्या कारभाराविषयी महाविकास आघाडीमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. सोबतच सत्ता पक्षातून येणाऱ्या प्रतिक्रिया ही दुर्दैवी असून सरकारने हे प्रकरण संवेदनशील रित्या हाताळावे.” अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here