Mangaldas Bandal Arrest | माजी झेडपी सभापतीच्या घरी ईडीचा छापा; सापडलं कोट्यावधींचं घबाड

0
85
Mangaldas Bandal Arrest
Mangaldas Bandal Arrest

Mangaldas Bandal Arrest | पुणे : मंगलदास बांदल यांच्या शिरूर व पुण्यातील निवासस्थानांवर मंगळवार 20 ऑगस्ट रोजी छापा ईडी कडून छापा मारण्यात आला. मंगलदास बांदल पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. या छाप्याअंतर्गत बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यावधी रुपये सापडले. याच पार्श्वभूमीवरती त्यांची 16 तास चौकशी केली गेली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. संपूर्ण घटनेमुळे पुण्यामध्ये सध्या खळबळ माजली आहे.

घरात सापडले कोट्यावधी

सूत्रांच्या माहितीनुसार इडी कडून मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी बांदलांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर येथील महंमदवाडी परिसरातीत निवासस्थानांवरती सकाळी 7 च्या दरम्यान अचानक छापेमारी करण्यात आली. या छापेमारीतून त्यांच्या घरातून जवळजवळ 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जमा करण्यात आली. याच सोबत त्यांच्याजवळ असलेल्या आलिशान कार्स आणि 1 कोटी किमतीची 4 घड्याळे देखील यावेळेस इडीकडून जप्त करण्यात आली.

Nashik Crime | नाशकात चिमुकलीला ओरबाडले; बदलापूरनंतर नाशिकमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवरत्याचार

Mangaldas Bandal Arrest | 16 तास कसून चौकशी

ईडी कडून मारलेल्या छाप्यानंतर मंगलदास बांदल यांची जवळजवळ 16 तास कसून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर शिक्रापूर येथे वास्तव्यास असलेले त्यांचे दोन भाऊ, त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबीय यांची देखील चौकशी करण्यात आली. ही 16 तासांची चौकशी मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी येथील राहत्या घरात करण्यात आली. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली असून आज मुंबई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकसभेला वंचित कडून मिळाली होती उमेदवारी

यंदाच्या वर्षात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळाली होती. शिरूर मतदार संघातून मंगलदास बांदल लोकसभेसाठी उभे राहिले होते. परंतु त्यानंतर इंदापूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या मेळाव्यात त्यांनी हजेरी लावली. परिणामी वंचितकडून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर मात्र बांदलांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती मध्ये व शिवाजीराव आढळराव यांचा शिरूर मध्ये प्रचार केला. ते सध्या विधानसभेसाठी तयारी करत होते.

Rajyasabha Candidate | भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते

येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी मंगलदास बांदल इच्छुक असल्याची चर्चा होती. शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी उभे राहणार असल्याच्या चर्चा उफाळत होत्या. यापूर्वी मंगलदास बांदल हे शिवाजी भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी येरवडा कारागृहात होते व सध्या ते जामिनावर बाहेर आले होते. ईडीने यापूर्वी त्यांना समंस बजावला होता. त्यावेळी ते चौकशीसाठी हजर ही झाले होते या चौकशीनंतरच ईडीने ही कारवाई केल्याचे आता समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्यामुळे संपूर्ण पुण्यामध्ये सध्या चर्चांना वेग आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here