Badlapur Case | राज्यात सकाळपासूनच बदलापूर अत्याचार प्रकरण मोठ्या प्रमाणात पेटले असून, चिमूकल्यांवरील अत्याचाराच्या विरोधात संतप्त बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. आज शहरात बंदही पुकारण्यात आला असून, राज्याच्या राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बदलापूरमधील (Badlapur School) एका नामांकित शाळेत एका साडे तीन आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणाचा सर्वच स्तरांवरून निषेध व्यक्त केला जात आहे.
एकदा तरी अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या
या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकदा तरी अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या, त्याशिवाय त्यांना धडकी भरणार नाही. त्यांना असं वागताना भिती वाटली पाहिजे. कुठल्या महिलेकडे पाहताना त्यांना धडकी भरली पाहिजे, हात लावणं तर दूरच पण पाहतानाही त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी घेतली आहे.
Badlapur Case | लाडक्या बहिणींना पैसे नको सुरक्षा द्या; शाळेत तीन वर्षांच्या चिमूकल्यांवर अत्याचार
आंदोलन चिघळलं; शाळेची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक
दरम्यान, आज सकाळपासूनच या चिमूकल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने संतप्त बदलापुरकर रस्त्यावर उतरले असून, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जमावाकडून केली जात आहे. सकाळी या शाळेच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. यानंतर अखेर शाळेकडून माफी मागत मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका, दोन आया यांचे निलंबन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या परकेणी लक्ष घालून कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र तरीही नागरिक मागे हटायला तयार नाही.(Badlapur Case)
या शाळेत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, बदलापूर शहरातील नागरिक हे आक्रमक झाले असून, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी स्थानकासह पोलिसांवरही दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात येत शाळेचे गेट तोडून थेट आंदोलक आतमध्ये घुसले आहे.
Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार
Badlapur Case | नेमकं प्रकरण काय..?
बदलापूर शहराच्या पूर्वेला असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या एका चार वर्षीय आणि एका सहा वर्षीय अशा दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन व स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप विरोधक आणि नगरिकांकडून केले जात आहे. कारण जेव्हा पीडित मुलींचे पालक हे पोलीसांत तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 12 तास ताटकळत ठेवले होते. (Badlapur Case)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम