Badalapur Rape Case : सध्या राज्यभरात बदलापूर येथे घडलेल्या अल्पवयीन शालेय मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने नागरिकांमध्ये रोष व संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर शाळेकडून व पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे हायकोर्टाने पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं होत. “नागरिकांनी न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेपर्यंत तुम्ही वाट बघत होता का?” असा सवाल करीत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सुनावले. मुंबई उच्च न्यायालयाने सदर घटनेची दखल घेत तातडीने सुनावणी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आणखीन धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Maharashtra Bandha | विरोधी पक्षांकडून बंदची हाक; उद्या राज्यात काय बंद काय सुरू असणार..?
नेमकं प्रकरण काय?
मंगळवार 13 ऑगस्टला बदलापूर येथील एका नामवंत शाळेत चार वर्षांच्या दोन अल्पवयीन शालेय मुलीवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार केले गेले. त्यातील एका मुलीच्या पालकांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांच्या अहवालात तिच्या प्रायव्हेट पार्ट ला दुखापत झाल्याची बाब समोर आली. या अहवालाला जेव्हा पालकांनी शाळेत नेऊन विचारपूस केली तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिकेने “शाळेबाहेर काहीतरी झाले असेल किंवा सायकल चालवताना दुखापत झाली असेल.” असा दावा करत डॉक्टरांचा अहवाल फेटाळला असे पीडित मुलीच्या पालकांनी सांगितले.
शाळा प्रशासनाची पोलिसांसोबत गुप्त बैठक
बदलापूर येथे घडलेली ही घटना एका नामवंत शाळेत घडल्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे आरोप पीडितेच्या पालकांनी केले. प्रकरण दाबण्यासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक केली असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.
Maharashtra News | महाराष्ट्रातील ‘लापता लेडीज’ची संख्या लाखांवर; धक्कादायक आकडेवारी समोर
केव्हा घडली घटना
बदलापूर येथील ही घटना 13 ऑगस्टला घडली. घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची 1 ऑगस्टला सफाई कामगार म्हणून शाळेमध्ये नेमणूक करण्यात आली होती व त्याच्यावर मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 12 आणि 13 तारखेला शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर आरोपीकडून अत्याचार करण्यात आले. 14 तारखेला त्यातील एका मुलीने आपल्या आजोबांजवळ आपल्या गुप्तांगाजवळ त्रास होत असल्याची तक्रार केली तसेच तिने आईजवळ ही सांगितले. घाबरून पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन लावला तेव्हा तिने देखील शाळेत जाण्यास नकार दिल्याचे सांगितले. पालकांनी तातडीने दोघींनाही खाजगी रुग्णालयात वैयक्तिक तपासणीसाठी दाखल केले असता वैद्यकीय तपासणीतून दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली.
यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पालकांना पोलीस प्रशासनाकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले. ही बाब जनतेसमोर येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तातडीने बदली करण्यात आली. त्याचबरोबर दोन नवीन पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची बदलापूर पोलीस ठाण्यात त्वरितच नियुक्ती करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम