Bacchu Kadu | सध्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकतात. तेव्हा सर्वच पक्षांमध्ये सध्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यातच आता बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभेसाठी जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेत, जोरदार फिल्डिंग लावली असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. त्यांनी जिल्ह्यातील 15 पैकी दोन मतदार संघाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे आता मविआ आणि महायुतीचं टेन्शन वाढवलं आहे.
Nashik Politics | बडगुजर प्रकरणाला नवं वळणं; अंबड पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात
भाजप ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समितीचे उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला राम राम करत काल नाशिकच्या निफाडमध्ये प्रहार जनशक्तीच्यावतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात बच्चू कडूंच्या उपस्थितीत प्रवेश केला.
‘या’ दोन मतदारसंघांतून उमेदवारी जाहीर
त्यानंतर, बच्चू कडूंनी गुरुदेव कांदे यांना निफाड विधानसभा मतदार संघातून, तर प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निफाड आणि चांदवड विधानसभा मतदारसंघांमध्ये त्रिशंकू लढत पाहायला मिळणार आहे.
Nashik | मालेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण
बच्चू कडूंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
या दरम्यान बच्चू कडू यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची जमवाजमव सुरू असून, या तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य या पक्षांसह प्रहारचा प्रवेश असेल असे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले आहे. त्यामुळे आता ही आघाडी राज्यभरात कितपत प्रभाव पाडू शकेल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम