Shivsena Shinde Gat | शिंदेंच्या ‘हौशी’ नेत्याने शिवलेल्या कोटची घडी मोडणार; मंत्रीपदी वर्णी लागणार..?

0
40
#image_title

Shivsena Shinde Gat | शिंदे गटाच्या आमदाराची अखेर स्वप्नपूर्ती झाली! महाडचे आमदार भरत गोगावले हे सुरुवातीपासूनच मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांना आता महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाणार असून आज दुपारपर्यंत त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा तसेच महामंडळावर नियुक्त्या केल्या जात आहेत. यामध्ये आता भरत भोगावल्यांची वर्णी लागली आहे.

Political News | नरहरी झिरवाळ मुख्यमंत्र्यांवर नाराज; थेट राजीनाम्याचा दिला इशारा

नुकतीच महामंडळाच्या अध्यक्षपदी शिंदे गटातील तीन आमदारांची वर्णी लागली होती. त्याच्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाठ या नावांचा समावेश होता. टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदेंकडून त्यांच्या पक्षातील नेत्यांची महामंडळात नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे या नियुक्त्यांवरून अजितदादा गटात मात्र नाराजीचे सुर आहेत.

महायुतीत नाराजीचे सूर

सध्या महायुतीत केवळ एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसेच मंत्रिपदाचे वाटप होत असल्यामुळे महायुतीतील इतर दोन पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून विधानसभा निवडणूक आता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. तेव्हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पद मिळत असल्याने गोगावले हे पद स्वीकारतील की नाही यातही शंका उपस्थित केली जात आहे एसटी महामंडळाचे पद हे कॅबिनेटच्या दर्जाचे असून गोगावले यांनी यापूर्वीच अनेकदा मंत्रीपद मिळवण्याबाबत आपली इच्छा बोलून दाखवली होती. भरत गोगावलेंनी मंत्रीपद मिळण्याच्या खात्रीने शपथविधीसाठी कोटही शिवला होता. पण त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळाले नाही आणि तो कोट तसाच पडून राहिला. त्यानंतर गोगावलेंच्या मंत्रिपदाचा विषय टिंगलटवाळीचा झाला. आता मात्र मंत्रीपद नाही पण एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद मिळत असल्याने भरत गोगावलेंच्या त्या कोटाची घडी मोडणार का? अशा चर्चांना उन्हाळा आहे.

Political News | ‘जरांगेंचे लाड हे जातीयवादी…’; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची माहिती

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये भरत गोगावले आणि संजय शिरसाठ यांचे नाव अग्रेसर आहे. भरत गोगावले यांनी अनेकदा आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली असून ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रतिउत्तर देण्याच्या प्रयत्नात ते असल्याचे वारंवार पाहायला मिळते. तेव्हा भरत गोगावलेंना मंत्रिमंडळाचा प्रबळ दावेदार मानले गेले होते व पहिल्या कॅबिनेट विस्तारातच त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. पण ऐनवेळी त्यांची ही संधी हुकली, त्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेण्याचा योग काही आला नाही. त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याचेही सांगितले जात होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here