Assembly Election | विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता उमेदवारांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रचाराच्या सभांसाठी मैदाने एलईडी स्क्रीन, विविध प्रकारच्या गाड्या यांच्या परवानगी करिता एकूण 415 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवड्यात जिल्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडालेलं दृश्य पाहायला मिळणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी 40 लाख रुपयांच्या खर्च करण्याचे बंधन आहे.
Assembly Election | नाशकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू; आज ‘या’ दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज
निवडणुकीच्या प्रचाराच्या खर्चापेक्षा निवडणूक विभागाकडून विविध परवानग्या मिळवण्यातच सर्वाधिक वेळ जात असून प्रचाराची गाडी, त्यावरील भोंगे त्याचा आकार गाडीच्या प्रकारानुसार खर्चात बदल होतो. त्यामुळे परवानगी मिळवण्यातच उमेदवारांची कस लागते. एकीकडे प्रचाराचे दौरे सांभाळायचे तर दुसरीकडे परवानगी मिळवायची अशी दुहेरी कसरत करावी लागते आहे. तर प्रचारासाठी चारचाकी वाहने रिक्षा सायकल एलईडी व्हॅनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
भाजप, राष्ट्रवादीच्या जंगी सभा होणार?
शिवाय बड्या नेत्यांच्या सभांसाठी मंगल कार्यालय, जाहीर सभांसाठी मैदानी व चौक सभांसाठी परवानगी घेताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने परवानगी दिली जाते. नाशिक पूर्व मतदारसंघात तपोवनातील मैदानावरील सभेसाठी सात ते आठ अर्ज आतापर्यंत करण्यात आले आहेत. यात नेत्यांचा उल्लेख नसल्याने केवळ परवानगीसाठी अर्ज दाखल करून ठेवले गेले आहेत. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या ठिकाणी जंगी सभा होणार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.
नाशिक पश्चिम मधून सर्वाधिक 109 अर्ज दाखल
यात नाशिक पश्चिम मतदारसंघात आतापर्यंत 109 अर्ज प्राप्त झाले असून तेथील सभांपेक्षा विविध छोट्या-मोठ्या परवानगी यांचे सर्व जास्त आहेत. तर नाशिकमध्य मतदारसंघात 34 अर्ज प्राप्त झाले. असून यात प्रचार वाहनांसह चौकसभा सभागृहे आदींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. कुठल्याही मंगल कार्यालयाचे प्रति दिवसाचे भाडे 50 हजार रुपये निश्चित करण्यात आले असून मैदानासाठी सातशे रुपये अधिक जीएसटी घेतला जात आहे.
दरम्यान, प्रचाराचे प्रभावी माध्यम असलेल्या एलईडी स्क्रीनसाठी उमेदवारांना दहा हजार रुपये प्रतिदिवस याप्रमाणे, पैसे मोजावे लागतात. तर 360 डायड्रोलिक एलईडी स्क्रीन सध्या उमेदवारांच्या पसंतीस पडत असल्याचे चित्र आहे. या व्यतिरिक्त एस.एम.एस पॅक, प्रचार दौऱ्याचा कार्यक्रम, व्हाट्सअप पोस्ट आदी डिजिटल साहित्याचा प्रभावीपणे वापर केला जातो. कार्यक्रम त्यांना व्हेज नॉनव्हेज जेवण, बिर्याणी यांचे ही दर निश्चित केले जात आहेत. त्यानुसार, खर्च सादर करणे उमेदवारांना बंधनकारक आहे.
Assembly Election | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर
आतापर्यंत करण्यात आलेले अर्ज
चांदवड-देवळा मतदार संघातून एकूण 11 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 11 ही अर्ज मंजूर झाले आहेत. बागलाण येथून 11 पैकी 11, देवळाली मतदारसंघातून 5 पैकी 5, दिंडोरी पेठेतून 9 अर्ज करण्यात आले असून अद्याप अर्ज मंजुरी नाही. इगतपुरी-त्रंबकेश्वर मधून 9 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कळवण-सुरगाणा मधून 29 पैकी 24, मालेगाव मध्य मधून 28 पैकी 24, मालेगाव बाह्य मधून 32 पैकी 22, नांदगाव मधून 27 पैकी 21, नाशिक मध्य मधून 34 पैकी 22, नाशिक पूर्व मधून 31 पैकी 19, नाशिक पश्चिम मधून सर्वाधिक 109 पैकी 58 अर्ज मंजूर झाले आहेत. तर निफाडमधून 18 पैकी 16, सिन्नर मधून 31 अर्ज करण्यात आले असून येवला येथून 29 पैकी 25 अर्ज मंजूर झाले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम