Assembly Election | राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपाने अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर, काही जणांची तिकीटं कापण्यात आली असून अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
Assembly Election | अखेर विधानसभेचे बिगुल वाजले; ‘या’ तारखेला एकाच टप्प्यात होणार मतदान
चांदवड मतदार संघातून यांना मिळाली संधी
भाजपच्या पहिल्या यादीत चांदवड मतदारसंघातून आमदार डॉ. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. तर नाशिक पूर्व मधून ॲड. राहुल ढिकाले यांचे नाव जाहीर झाले आहे. तर नाशिक पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार सीमा हिरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
नाशिक पश्चिम मधून सीमा हिरेंना पुन्हा एकदा संधी
दरम्यान, चांदवड-देवळा मतदार संघातून राहुल आहेर यांनी माघार घेत बंधू केदा आहेर यांचा मार्ग मोकळा केला होता. परंतु पक्षाकडून उमेदवारांच्या यादी त्यांचे नाव जाहीर झाले आहे. तर नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांकडून विरोध करण्यात आला होता. या निवडणुकीला पश्चिम मतदारसंघातून नवीन चेहऱ्यास संधी मिळावी. अशी मागणी करण्यात आली होती. परंतु जाहीर झालेल्या यादीमध्ये विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम