Dasara Melava | मुंबईत आज शाब्दिक युद्ध अंतिम टोकाला पोहचले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाषणाला सुरुवात करताच शिंदे गटाला जोरदार अंगावर घेतले आहे. दसरा मेळावा एकच असतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. गद्दारांनी दिल्लीच्या मालकांची चाकरी करावी, अशी टिका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. तुम्हाला आता घरीच बसायचं आहे. काय करायचं आहे ते तुम्हीच ठरवा, असंदेखील अंबादास दानवे म्हणाले.
बोधीवृक्ष ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब; भुजबळांनी केल्या भावना व्यक्त
राज्यात पापींचं राज्य आहे. त्यामुळे आपल्यावर निसर्ग कोपतोय. अर्ध्या पेक्षा जास्त महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. एक रुपयात पीक विम्याचं गाजर शेतकऱ्यांना दाखवलं गेलं. विमा कंपन्यांची खळगी भरण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा डाव आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केला.
कोणताच दवाखाना आपला दवाखाना राहिलेला नाही. सर्व दवाखाने भांडवलदारांचे झाले आहेत. वर्षभरात 6700 बालकांचा मृत्यू झालाय. या महाराष्ट्राला हे अभिमानास्पद नाही, ही आकडेवारी सरकारची आहे. बेटी बचाओची घोषणा होते. पण दररोज 70 मुली बेपत्ता होतात. स्वत:चं 9 कंपन्या देऊन खाजगीकरण केलं. भाजपच्या चेल्या-चपाट्यांच्या कंपन्या होत्या. 32 लाख लोकांना कंत्राटी पद्धतीने नोकरी दिला जात असेल तर सर्वसामान्य तरुणांनी करायचं काय? अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. या सरकारने नोकर भरतीच्या नावाने कोट्यवधींचा निधी मिळवला. इतर राज्यात केवळ कार्डने स्वॅप करुन 100 रुपये फी घेतली जाते, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
‘छाताडावर बसणार पण आरक्षण नाही सोडणार’; मनोज जरांगेंचा निर्धार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी 98 टक्के शेतकऱ्यांना 2 लाख रुपये एका थम्बवर दिले होते. पंतप्रधान किसान योजनाचं बोलायचं झालं तर लाभार्थ्यांची संख्या आता कमी झालीय. ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. सरकार म्हणतं ‘सरकार आपल्या दारी’ पण ‘मी म्हणतो मृत्यू घरोघरी’, आरोग्य विभागाची परिस्थिती भयानक आहे. रुग्णांना औषधी मिळत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. सरकार खोटं बोलत आहे, औषध दिल्याची खोटी माहिती देत आहे. रुग्णालयात स्टाफही नाही. सरकार डॉक्टरांचा सन्मान राखत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. गद्दारांनी दिल्लीच्या मालकांची चाकरी करावी’, अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम