Ajit Pawar | शरद पवारांची राजकीय गुगली; अजित दादा एकटे पडले

0
13
Ajit Pawar MLA
Ajit Pawar MLA

Ajit Pawar |  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी होत असून, आता राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील संघर्षात नेहमी अजित पवार आघाडीवर होते. तर, त्यांनी वेळोवेळी शरद पवारांना धक्का दिला. आधी निवडणूक पक्ष आणि चिन्ह त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून दिलेली मान्यता.(Ajit Pawar)

दरम्यान, आता शरद पवारांनी सिक्सर मारला असून, पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये अजित पवारांना स्वतःच्याच घरातून मोठा धक्का बसला आहे. तर, गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी बारामतीत केलेले “बारामतीत मला एकट पाडलं जाईल, कुटुंबातील कुणीही व्यक्ती माझ्यासोबत नसेल” हे खरे होताना दिसत आहे.

Chhagan Bhujbal | वर गोधडी पांघरतो अन् आत सर्व चालू; भुजबळांचे आरोप

Ajit Pawar | नणंद विरुद्ध भावजय असा सामना

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात असून, ही लढत पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. मात्र, बारामतीत अजित पवारांना पहिला झटका बसणार असून, त्यांच्या सख्खा पुतण्याच त्यांची साथ सोडणार असल्याचे सांगितले जात आहे. युगेंद्र पवार हे आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतच काही दिवसांपूर्वी अजित पवार एका भाषणात म्हटले होते की, “बारामतीमध्ये मला एकटं पाडलं जाईल. कुटुंबातील कुणीही व्यक्ती माझ्याबरोबर नसेल” ही परिस्थिती आता बारामतीत सत्यात उतरताना दिसत आहे. त्याची सुरुवात झाली आहे.(Ajit Pawar)

Ajit Pawar | अजित पवारांनी हद्दच पार केली..; काकांच्याच मरणाची वाट पाहता..?

कोण आहेत युगेंद्र पवार?

राष्ट्रवादीमध्ये काका पुतण्याची परंपरा आहे. आधी शरद पवार आणि अजित पवार. त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार. दरम्यान, आता आजिर दादांचा सख्खा पुतण्या देखील राजकारणात दाखल झाला असून, त्यांनी मात्र काकांऐवजी आजोबांना साथ देण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे असून, ते श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. अटार, आज युगेंद्र पवार हे बारामतीत शरद पवार यांच्या कार्यालयात भेट देणार आहेत.

त्यामुळे आज युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. युगेंद्र पवार यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, “ते अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात आलेले आहेत. युगेंद्र पवार हे बारामतीमधील काही संघटनाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांचा तिथे मोठा जनसंपर्क आहे.” दरम्यान, त्यांनीच शरद पवारांना साथ दिल्यास हा अजित पवारांसाठी मोठा राजकीय धक्का समजाला जाईल. (Ajit Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here