Deola | खालप येथे शुक्रवारपासून खंडेराव महाराज यात्रोत्सव

0
67
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील खालप येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सव हा शुक्रवार (दि. २३ फेब्रुवारी) पासून सुरू होणार असून, पुढील तीन दिवस सुरू असणार आहे. या निमित्ताने बारा गाडी ओढणे, कुस्तीचा फड व लोकनाट्य तमाशा मंडळाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खंडेराव महाराज सेवेकरी मंडळ आणि खालप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी केले आहे. सालाबादप्रमाणे खालप येथे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सव साजरा करण्यात येत असून, पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Deola)

Deola | रौद्रशंभु ट्रेकर्सकडून गेल्या पाच वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी

Deola | असे आहेत कार्यक्रम –

  • दि. २३ फेब्रुवारी –  खंडेराव मंदिरावर मांडव बांधणे,
  • दि. २४ फेब्रुवारी – सकाळी मांडव टाकणे, दुपारी ३ वाजता खंडेराव मंदिर ते राममंदिर प्रवेशद्वारापर्यंत खंडेराव महाराज भक्त विजय देवराम काकुळते यांचा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर, रात्री ९ वाजता जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  •  दि. २५ फेब्रुवारी – दुपारी ३ वाजता कुस्ती दंगल, रात्री ९ वाजता क्रांतिभाऊ सोनवणे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तीन दिवस होणाऱ्या या यात्रेत खेळणी पाळणे, हॉटेल आदी दुकाने थाटण्यात येणार असून, या यात्रा उत्सवात परिसरातील भाविकांनी, तसेच अबालवृद्ध, युवक, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन खालप ग्रामपंचायत पदाधिकारी, यात्रा उत्सव कमिटी व खंडेराव महाराज भक्त मित्रमंडळ व युवक मंडळ यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here