Ajit Pawar | अजित पवारांनी हद्दच पार केली..; काकांच्याच मरणाची वाट पाहता..?

0
58
Ajit Pawar MLA
Ajit Pawar MLA

Ajit Pawar |  आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या एका सभेत, “ही शेवटची निवडणूक आहे” असं भावनिक आवाहनही जनतेला करण्यात येईल, आता कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित?, असे वक्तव्य केलं. दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या या व्यक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

यावेळी ते म्हणाले की,”ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला स्वतःच्या मांडीवर बसवलं. त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण, असं म्हणताय म्हणजे तुम्हाला आता पाषाण हृदयीही म्हणता येणार नाही. पाषाणालाही कधीतरी पाझर फुटतो पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच उरलं नाही. शरद पवारांचे मरण हीच तुमची इच्छा असून, त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा असल्याचे दिसत आहे, असे प्रत्युत्तर आव्हाडांनी अजित पवारांना दिले आहे. (Ajit Pawar)

Doctors Strike | सरकारकडून आश्वासनांचे गाजर; निवासी डॉक्टर संपावर

Ajit Pawar | शरद पवार अजरामर राहतील

एखाद्या माणसाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे हे कितपत योग्य आहे. तुम्ही तर तुमच्या काकाच्याच मृत्यूची वाट पाहताय. शरद पवार हे अजरामर राहतील. त्यांचे देशासाठीचे योगदानही अजरामर राहील. शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघताय, तुम्ही आज सगळी हद्दच ओलांडली. येणाऱ्या काळात जनताच आता तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेल, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर शाब्दिक आसूड ओढले.(Ajit Pawar)

महाराष्ट्र पवारांना विसरणार नाही

“आमची सत्ता गेली तरी चालेल. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारच असे आश्वासन देणारे शरद पवार, महिला भगिनींना आरक्षण मिळवून देणारे शरद पवार, लातूरला भूकंप झाला तेव्हा ते तब्बल दीड महिने तिथेच राहिले व लोकांची घरं उभारली हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal | अन् सर्वांनीच भुजबळांना तोंडावर पाडलं

तुमची लाज वाटते..?

शरद पवार हे देशाचे एक मोठे नेते असून, तुम्हाला तर राज्यातही कोणी ओळखत नाही. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा असून, त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय. तुम्हाला त्यांचा किती द्वेष आहे हे मी आधीपासूनच बघितलंय. कोणत्याच मिटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कधीही बघत नव्हते. मला तुमच्यासोबत कधीकाळी काम केले आहे याची लाज वाटते, अशी बोचरी टीकाही यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली.(Ajit Pawar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here