Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून काल पंचसूत्री मांडण्यात आली. यामध्ये महिलांना दरमहा 3 हजार रुपये तर बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये देण्याच्या आश्वासन देण्यात आले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याचा महाविकास आघाडीचे पंचसूत्र या योजनांची अंमलबजावणी केल्यास विकासाला पैसे कुठून आणणार असा खोचक सवाल केला आहे.
NCP Ajit Pawar | सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला 36 तासांचा अल्टिमेटम; काय आहे प्रकरण?
नेमके काय म्हणाले अजित पवार?
महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीवर भाष्य करत अजित पवारांनी, “बेरोजगारांना 4000 देणार, महिलांना 3000 देणार कर्जमाफी ही करणार या सर्वाला साधारण 3 लाख कोटी लागणार. सध्या राज्याचे बजेटच साडेसहा लाख लाख कोटी रुपयांचे आहे. पुढच्या वर्षी बजेट सात लाख कोटींवर जाईल. मग बजेट मधील निम्मे पैसे हे पेन्शन, पगारासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर आणि निम्मे उरलेल्या पैशात यांच्या योजना मग डेव्हलपमेंटसाठी पैसे कुठून आणणार?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, “केंद्र सरकार त्यांच्या विरोध विचारांचे नाही. तेव्हा उगाच काहीतरी सांगायचे म्हणून सांगतात. निदान पटेल असे सांगायचे.” असा टोला अजित पवारांनी आघाडीला लगावला आहे.
हे महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक करत आहेत
पुढे बोलत, “आमच्या योजना या 75 कोटी पर्यंतच्या आहेत. परंतु ते या योजना तीन लाख कोटींपर्यंत घेऊन जाण्याचे म्हणतायेत. ते म्हणाले होते ते आम्हाला देऊ शकत नाहीत. पण तुम्ही त्यात दुप्पट व तिप्पट वाढ करताय. मग हे कसे शक्य आहे? तुम्ही जादूची कांडी फिरवणार आहात का? हे महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक करत आहेत.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
Ajit Pawar | ‘केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव’ म्हणत अजित पवारांचा आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
दरम्यान, अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असून नुकतीच प्रकाश आंबेडकर यांच्यावर एन्जिओग्राफी करण्यात आली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची विचारपूस करण्याकरिता ही भेट झाल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम