NCP Ajit Pawar | राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्या असतानाच दिल्लीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना 36 तासांचा अल्टिमेट टर्म दिले असून येत्या 36 तासांमध्ये अजित पवारांना पक्ष चिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रात छापायचे असल्यास तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर
सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश
सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी सुरू असून आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठित आहे. असा डिस्क्लेमर दिला जात आहे. असे अजित पवार पक्षाकडून सांगितले गेले. परंतु शरद पवार गटाने त्यावर अक्षय घेतला. त्यानंतर, सुप्रीम कोर्ट सुनावणी दरम्यान, डिस्क्लेमर बाबत विचारणा करण्यात आली असता त्यानुसार, ‘आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असा डिस्क्लेमर दिला जात आहे.’ असे अजित पवार पक्षाच्या वकिलांकडून सांगण्यात आले. ‘तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का?’ अशी कोर्टाकडून विचारणा करण्यात आली. त्यावर, ‘दररोज नाही मात्र गरजेच्या ठिकाणी आम्ही प्रकटीकरण देत आहोत.’ असे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. त्यावर ‘पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य आहे.’ असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर
शरद पवारांकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरू
दरम्यान, शरद पवार पक्षाचे वकील प्रांजल अग्रवाल यांनी अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा केला होता. अजित पवारांच्या वकिलांकडून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत असल्याचा दावा करण्यात आला असून शरद पवारांकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच ‘अनेक ठिकाणी हे डिस्क्लेमर दिले नाहीत त्याचे स्क्रीन शॉट आहेत’ असे अग्रवाल यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असल्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाला दिले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम