Ajit Pawar | अजित पवार ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार!; प्रचाराच्या बॅनरने चर्चांना पूर्णविराम

0
51
#image_title

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आणि याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांनाही उधाण आले होते. अजित पवारांच्या काही विधानांमुळे ते निवडणूक लढवणार की नाही? आणि लढली तर कोणत्या मतदारसंघातून उतरणार? यावरून अनेक तर्क वितर्क लढवले गेले. पण अखेर यावर आता पडदा पडला असून दादांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रचारातून एक प्रकारे अजित पवार कोणत्या मतदारसंघातून लढणार हे स्पष्ट झाले आहे.

Ajit Pawar | इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा उमेदवार ठरला?; त्र्यंबकेश्वर येथील सभेत अजित पवारांची अप्रत्यक्ष घोषणा?

निवडणूक लढणार की नाही याबाबत संभ्रम? 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या पारंपरिक संघ असलेल्या बारामतीमधून विधानसभेसाठी प्रचाराला सुरुवात केली असून मतदारसंघात प्रचाराची वाहने फिरू लागली आहेत. यावर अजित पवारांचे फोटो व घड्याळाचे चिन्ह झळकत असून ‘दादांना विजयी करा’ असे आवाहन करणारा मजकूर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, बारामतीत लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी प्रचारादरम्यान, अजित पवारांनी एका सभेत “मला जर मिठाचा खडा लागला तर मी इथून विधानसभा लढवणार नाही” असे विधान केले होते. त्यानंतर देखील सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून 48 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवडणुकीतील पीछेहाट अजित पवारांच्या वर्मी लागली असून ते विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

Ajit Pawar | ‘जातीपातीचे, धार्मिक राजकारण नाही तर यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावर काम करत आहोत’; अजित पवार कडाडले

काका विरुद्ध पुतण्या लढत पाहायला मिळणार? 

बारामतीतील अजित पवारांच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये ही संभ्रमावस्था असून अजित पवार यांनी बारामती मधील कार्यक्रमांमधून “आपण बारामती मध्ये जो उमेदवार देऊ, त्याच्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल.” असे वक्तव्य करत उमेदवारीबाबत संभ्रम वाढवला होता. बारामती तालुक्यात शरद पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरुवातीपासूनच असून त्यांच्या विरोधात अजित पवारांचे पुत्र जय पवार असतील अशी चर्चा रंगली होती. पण अजित पवार यांचे समर्थक स्वतः अजित पवारांनी विधानसभा निवडणूक लढवावी याकरिता आग्रही होते. त्यानंतर देखील अजित पवारांनी आपल्या उमेदवारीबाबत स्पष्टपणे कोणती भूमिका मांडली नव्हती. त्यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान, अजित पवारांचा ताफा अडवत कार्यकर्त्यांनी “आत्ताच उमेदवारी जाहीर करा म्हणत गळ घातली.” परंतु यावेळी अजित पवारांनी “तुमच्या मनातला उमेदवार असेल” असे सांगत स्पष्टपणे बोलणे टाळले होते. अखेर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणाऱ्या प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केल्यानंतर आता अजित पवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here