Ajit Pawar | लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी केलेल्या विधानावर अजित पवारांच प्रतिउत्तर

0
36
#image_title

Ajit Pawar | सध्या राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टिकांचे युद्ध सुरू आहे. यातच महायुती सरकारने घोषित केलेल्या लाडकी बहिणी योजनेवरून महाविकास आघाडीतील अनेक नेते वारंवार टीका करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

“दीड हजार रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रू वाचवावी” असं म्हणत शरद पवार यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली होती. त्यानंतर या टिकेला प्रतिउत्तर देत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “शंभर टक्के महिलांची अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न प्रत्येक सरकार करते, त्याप्रमाणे आम्ही देखील करतोय. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते.” असं म्हणत शरद पवारांच्या टीकेवर पलटवार केला. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलले.

Ajit Pawar | पक्षनेत्यांच्या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा; NCP लढवणार इतक्या जागा?

नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

“बारामतीत एका महिलेने काही दिवसांपूर्वी सांगितले की गॅंग रेप झाला. मात्र तपासाअंती स्पष्ट झाले की तसं काही झालं नव्हतं. पण अशावेळी मात्र पोलिसांची, संस्थेची, बारामतीची बदनामी झाली. त्यामुळे अशा घटना घडता कामा नयेत. तक्रार आल्यानंतर एसपी आणि संबंधित सगळ्या प्रशासनाने ताकद लावली. तेव्हा कारण नसताना कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नये.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

अजित पवारांनी घेतले लालबागचा राजाचे दर्शन

आज अजित पवार यांनी मुंबईतील लालबागचा राजाचे दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, “मी एक दिवस बारामतीला गेलो होतो, पुण्याला दर्शनासाठी गेलो होतो, आज मुंबईत लालबागचा राजा चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो. माझा कटाक्ष असतो गर्दीच्या वेळी आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास होऊ नये. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये. बाप्पाकडे काही मागितले नाही. राज्यात सुख, समाधान, शांती राहू देत आणि सर्वांची भरभराट होऊ देत. प्रत्येकाची भावना असते सर्वांच भलं होऊ दे असं साकडं घातलंय.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

Ajit Pawar | ‘असेल हिम्मत तर समोर या’; जनसन्मान यात्रेच्या सभेत अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला

विधानसभा निवडणुकांबद्दल काय म्हणाले? 

सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून निवडणुका कधी आहेत हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तेव्हा, “राज्यात विधानसभेची निवडणूक कधी लागणार?” असा प्रश्न विचारला असता सध्या मलाच काही माहीत नाही. निवडणूक आयोग ज्यावेळेला निवडणुका लावतील त्यावेळेला निवडणूक असतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे निवडणूक किती टप्प्यात घ्यावं हा देखील त्यांचा अधिकार आहे. तेव्हा निवडणूक आयोग ठरवेल तेव्हा निवडणुका होतील.” असं त्यांनी यावेळी सांगितलं.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here