Ajit Pawar : राज्यामध्ये 12 आणि 13 ऑगस्टला बदलापूरातील नामवंत शाळेत दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार घडला. परंतु त्यानंतर शाळा व पोलीस प्रशासनाकडून केली गेलेली दिरंगाई यावर संताप व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणात अत्यंत असंवेदनशीलपणा दाखवण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी न्यायासाठी रेल रोको केला. परिणामी यंत्रणा कामाला लागली आणि प्रकरण जगजाहीर झाले. परंतु पोलीस प्रशासनाकडून केलेल्या हईगईवर संताप व्यक्त करत यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादांनी याप्रकरणी आपले परखड मत व्यक्त केले.
Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना
“छत्रपतींच्या विचारांचा विसर पडलाय”
“राज्यात स्त्रियांवर, लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांचे सामानच काढून टाकले पाहिजे.” असं संतापजनक वक्तव्य यवतमाळ येथील लाडकी बहीण कार्यक्रमात अजित पवार यांच्याकडून करण्यात आलं. यावेळी संपूर्ण घटनेविषयी त्यांनी आपला रोष व्यक्त केला. “आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. त्यांनी आपल्याला काय शिकवलंय याचा विसर पडून काही नालायक लोक आज अशा पद्धतीने वागून नालायकपणा करत आहेत. आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना बाहेर येत आहेत त्याच्याबद्दल कठोर आणि ठोस भूमिका घेण्याचे या कार्य सरकारने स्वीकारले आहे. विरोधकांना जो काही विरोध करायचा आहे तो त्यांनी करावा. लोकशाहीने प्रत्येकाला तशी मुभा दिली आहे. त्यावर मी काही बोलणार नाही.” असे म्हणत टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.
Uddhav Thackeray | ‘कंस मामा भाचीला न्याय कधी देणार?’; उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले
विकृत नराधमांची गय केली जाणार नाही!
बदलापूर प्रकरणात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. गुन्हेगार कितीही मोठ्या बापाचा असो त्याला फाशी व्हायलाच हवी. असे म्हणत त्यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली. राज्यातील अशा विकृत माणसांना, अशा नराधमांना शासन नक्की केले जाईल. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार डोळ्यात तेल घालून बसले आहे. त्याचबरोबर शक्ती कायदा लवकरच मंजूर व्हावा याकरिता हालचाली करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओवाळणी म्हणून 3000 दिले आहेत आणखीनही येतील.
लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करत आहेत, कोर्टात जात आहेत. परंतु माझी तुम्हा सर्वांना खात्रीने सांगतो की कोणालाही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. आता ओवाळणी म्हणून 3000 दिले आहेत पुढे आणखीनही येतील. महिलांना सरकारकडून 45 हजार कोटींची मदत मिळणार आहे. तेव्हा आमच्या चांगल्या योजनेला किती प्रतिसाद मिळतोय ते पहालच. असं म्हणत यावेळी विरोधकांना टोला लगावण्याचे कामही अजित पवारांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम