Ajit Pawar | अजित पवारांच्या अडचणींत वाढ! कोर्टाकडून हजर राहण्याचे समन्स; नेमकं प्रकरण काय…?

0
56
#image_title

Ajit Pawar | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान प्रक्रिया पार पडली असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत. 16 डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे.

Ajit Pawar | ‘योजनांनाच पैसे घालवणार मग विकास कसा करणार?’; मविआच्या पंचंसूत्रीची अजित पवारांनी उडवली खिल्ली

प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे याचिका दाखल

हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळचे प्रकरण असून बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती. यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावात अजित पवार गेले असता, गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही….तर गावचे पाणी बंद करू. अशी थेट धमकी दिली होती. तसेच “तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यात सोडवू. पण आम्हालाच मतदान करा.” असेही म्हटले होते.

याप्रकरणी अजित पवारांना आता कोर्टात हजर राहण्याचे समजवण्यात आले असून याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत पवारांकडून ‘उमेदवाराला मतदान केले नाही, तर गावाचं पाणी बंद करू’ असे वक्तव्य केल्यामुळे कोर्टाकडून समन्स बजावण्यात आल्याचे खोपडे यांनी सांगितले.

NCP Ajit Pawar | सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला 36 तासांचा अल्टिमेटम; काय आहे प्रकरण?

दहा वर्षानंतर प्रकरण सुनावणीला

2014 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार, शरद पवार एकत्र होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार व सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. 10 वर्षानंतर कोर्टात सुनावणीला आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले असून अजित पवार व सुप्रिया सुळे विरोधात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पवार यांची पत्नीचे पवार व अजित पवार यांची लढत झाली होती त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here