मुंबई : बदलापूरमध्ये दोन शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. याच प्रकरणासंदर्भात राज्यभरात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन केले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी तोंडावरती काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले जात आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि सरकार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली.
“कंस मामा भाचीला न्याय कधी मिळवून देतोय?” – उद्धव ठाकरे
बदलापूर मधील घटना घडल्यानंतर राज्यभरातील इतर ठिकाणांहून देखील अशी प्रकरणे दररोज बाहेर येताना दिसतायत. त्याचा मी काल घटनाक्रम वाचून दाखवला परंतु, “लाडक्या बहिणींवर अत्याचार होत असताना कंस मामा मात्र राख्या बांधण्यांमध्ये व्यस्त आहेत. राख्या बांधण्यामध्ये आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनांमध्ये अडकाठी घातली जाते. कंस मामा आपल्या भाचीला न्याय कधी मिळवून देणार?” असा संतप्त सवाल करत उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “इतके निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने आजवर पाहिले नव्हते.” असा घनाघाती आरोपही यावेळी त्यांनी राज्य सरकारवर केला.
Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना
“शक्ती कायदा धुळखात पडलाय…. त्याच्यावरील धूळ झटकावी”- उद्धव ठाकरे
आमचा महाराष्ट्र साधू संतांचा, फुले, शाहू आणि शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र आंबेडकरांचा आहे. हा महाराष्ट्र संस्कारीत आहे. ही एक बाजू झाली आणि दुसरीकडे मात्र विकृत आणि नराधम आहेत, ज्यांच्यावरती पांघरून घालणारं विकृत सरकारही आहे. यांच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे. आजपासून गावातील मुख्य चौकात स्वाक्षऱ्या जमा करून या स्वाक्षऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात पाठवत हा बंद आपण का करत आहोत हे दाखवून देऊयात. असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले. त्याचबरोबर शक्ती कायदा धुळखात पडलाय त्यावरील धूळ झटका आणि कायदा अमलात आणा. अशी विनंती मी राष्ट्रपतींना करतो आहे. “तुम्ही ठरवून सुद्धा आमचा आवाज बंद करू शकणार नाही.” सरकार जर आमच्या माता-भगिनींचा संरक्षण करण्यास असमर्थ असेल तर आम्ही खंबीर आहोत. जो शक्ती कायदा आपण तयार केला तो राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर अमलात आणावा अशी विनंती आहे.
महाविकास आघाडी कडून राज्यभरात काळ्या फिती बांधून हे मुक आंदोलन सुरू आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला असंख्य शिवसैनिकांनी सहभाग दर्शवला. या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तोंडाला काळा मास्क लावून, तसेच दंडाला काही फीत बांधून सहभागी झाले होते. मुंबईमध्ये सध्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून आंदोलकांनी भर पावसात देखील हे निषेध आंदोलन सुरू ठेवले आहे. या निषेध आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुलगा आदित्य ठाकरें सोबतच संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले आहेत. दादरच्या शिवसेना भावना बाहेर शिवसैनिकांनी निषेध आंदोलनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम