Ajit Pawar | अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण; अजित पवारांची मोठी घोषणा

0
32
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली. या कार्यक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात अजित पवारांनी मोठी घोषणा केली असून, अंगणवाडी सेविकांना मोठी आनंदाची बातमी यानिमित्ताने अजित पवारांनी दिली.

अंगणवाडी सेविकांचे मानधन हे १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याचे यावेळी अजित पवार यांनी जाहीर केले. “अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत असल्याची ग्वाही देत राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख व नाझेर काझी हे उत्तम काम करत असल्याचे संगत त्यांच्या कामाचे कौतुकही अजित पवारांनी केले.

Ajit Pawar | ‘असेल हिम्मत तर समोर या’; जनसन्मान यात्रेच्या सभेत अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला

या भागातील विकासाबाबत बोलताना ते म्हणाले की, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींचे आम्ही उद्घाटन केले आहे. उदगीरला कृषी वस्तू व्यापार केंद्र म्हणूनही मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री संजय बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले की, “जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या कामावर खूश आहोत” या शब्दांत मंत्री बनसोडे यांचे कौतुक करत त्यांना मतदान करण्याची विनंतीही यावेळी अजित पवारांनी जनतेला केली.

उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला असून प्राचीन काळापासून तो आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखला जातो. लातूर विमानतळाच्या विकासासाठी नाइट लँडिंग सुविधेसह सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू, असे आश्वासनही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here