Ajit Pawar | ईव्हीएमची बटणं कचाकचा दाबा, नाहीतर..; दादांची जीभ घसरली..?

0
14
Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar | आपल्या मिश्किल शैलीसाठी प्रसिद्ध असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या याच मिश्किल वकतव्यामुळे अडचणीत आले आहेत. अजित पवार हे इंदापूर येथे एका भाषणादरम्यान बोलले की आम्ही तुम्हाला निधी देत आहोत. त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं कचाकचा दाबा आणि जर तसं झालं नाही तर, आम्हालाही हात आखडता घ्यावा लागेल. त्यांचे हे वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे. (Ajit Pawar)

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आम्ही केलेल्या कामामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तो फायदा कोणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देत आहोत. पण जसं आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देत आहोत. तसंच मशीनमध्येही कचाकचा बटणं दाबा. म्हणजे मलाही जरा निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर मग माझाही हात आखडता येईल.

Ajit Pawar | शरद पवारांची राजकीय गुगली; अजित दादा एकटे पडले

कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील 

मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली. मी तेव्हा तेव्हा कामे केली आणि करतोच आहे. मला कामं करायला आवडतात.  आणि मला आदेश द्यायची सवय झाली आहे. म्हणून मी अधिकाऱ्यांना आदेश देतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा नसतो. मी जर कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील. त्यामुळे कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागतं. त्यांना सांभाळावं लागतं, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. (Ajit Pawar)

खासदार ढवळाढवळ करणार नाही

तसेच यावेळी ते म्हणाले की,”जो उमेदवार तुम्हाला दिला आहे. तो तिथला आमदार किंवा होऊ घातलेला आमदार असतो. आमदारांची इच्छा असते की खासदारांनी त्यात ढवळाढवळ करू नये. मी 40 वर्ष झाली या उमेदवाराला ओळखतो. 40 वर्षांपासून मी ओळखतो आहे. ते ढवळाढवळ करणार नाही आणि ते तुम्हाला बाहेरचेही वाटणार नाही. ते तुम्हाला आपलेसेच वाटतील. त्यामुळे मतदान करताना नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवा आणि मतदान करा. (Ajit Pawar)

Ajit Pawar | अजित पवारांनी हद्दच पार केली..; काकांच्याच मरणाची वाट पाहता..?

Ajit Pawar | कारण मी शब्दाचा पक्का आहे.

एखाद्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. तर पुढील 25- 50 वर्षाचा विचार करुनच काम करा. माझ्या बारामतीमध्येही मी 382 कोटींच्या कामांना मंजुरी देऊ शकलो नाही. पण इंदापूरच्या कामांना दिली आहे. कारण मी शब्दाचा पक्का आहे. मी महिन्यातून एक दिवस काढेल आणि सर्व कामांचा आढावा घेईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले. (Ajit Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here