Mahayuti Sarkar | केंद्राची राज्य सरकारवर नाराजी; अजित पवारांनी मागितली भर सभेत माफी

0
49

Mahayuti Sarkar : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण परिसरात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याची उंची 35 फूट असून हा पुतळा पंचधातुनी तयार केला होता. या पुत्राच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2023 मध्ये केले गेले होते. परंतु कोट्यावधींचा खर्च करूनही अनावरणानंतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीतच हा पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी महाराष्ट्र व देशासाठी योगदान दिले आहे. अशा दैवताचा पूर्णाकृती पुतळा वर्षभराच्या आतच कोसळला. त्यामुळे देशभरातून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील नेत्यांकडून या घटने संबंधित वेगवेगळी वक्तव्य केली गेली ज्यामुळे प्रकरण अधिक चिघळले. विरोधकांकडूनही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Rajkot Fort | ठाकरे ठाण मांडून, राणेही मागे हटायला तयार नाही; राजकोट किल्ल्यावर तूफान राडा

केंद्र सरकारने राज्य सरकारला सुनावले

“पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. या प्रकरणाला राज्य सरकारने गांभीर्याने घेतले नाही. याप्रकरणी राज्य मंत्रिमंडळातील काही नेत्यांकडून केली गेलेली हास्यास्पद विधाने चिंताजनक आहेत.” अशी तक्रार यावेळी केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आली आहे. तसेच “राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवं होतं.” अशी टिपणी ही देण्यात आली आहे.

“सदर घटना कोणामुळे घडली या घटनेची जबाबदारी कोणाची यावर भाष्य करण्यापेक्षा घटने मुळे जनतेमध्ये पसरलेला असंतोष दूर करणे जास्त गरजेचे होते. शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती.” असे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून व्यक्त केले जात आहे. तसेच “विरोधक या गोष्टीचे राजकारण करत असून याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.” असा सल्ला देखील यावेळी राज्य सरकारला देण्यात आला आहे. अशा घटना सबुरीने व काळजीपूर्वकरीत्या हाताळाव्या. या संवेदनशील प्रकरणात केल्या गेलेल्या विधानांमुळे कल्याणकारी योजना प्रचारामध्ये मोठा अडथळा येऊ शकतो.” असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. बदलापूर मधील प्रकरण राज्य सरकारला जड गेला आहे. त्यामुळे मालवण मध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा दुरावस्थेअभावी कोसळला या प्रकरणामुळे राज्य सरकारने आणलेल्या कल्याणकारी योजनांना जनतेसमोर घेऊन जाणं कठीण होणार असून परिणामी या योजनांना खो बसण्याची शक्यता आहे. तसेच सरकारचे काम कमी पडतंय.” असं म्हणत केंद्रीय नेतृत्वाकडून घडलेल्या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Aditya Thackeray | “ठाकरेंचं ‘पवार स्टाईल’ भाषण; मिंधे, चींधीचोर, बालिश म्हणत डिवचलं

अजित पवारांनी भर सभेत मागितली सर्वांची माफी

राज्य सरकारच्या कारभारावर केंद्रातून नाराजी व्यक्त केली गेल्यानंतर, “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. या दैवताचा पुतळा वर्षभरातच नादुरुस्त होणे हे सर्वांनाच धक्का देणारं प्रकरण आहे. हे कोणी केलं? का केलं? त्याचा तपास लावलाच पाहिजे. त्यासंदर्भातच राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची जाहीर माफी मागतो.” या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भर सभेमध्ये सर्वांची माफी मागितली. “या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालचे अधिकारी असो किंवा कंत्राटदार असो त्यांची तपासणी होईल. त्या कंत्राट दाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे.” अशी भूमिका यावेळी अजित पवारांनी मांडली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here