दहा वर्षानंतर अडसरे खुर्द निवडणूकित परिवर्तन पॅनेलची सत्ता

0
3

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्टया अत्यंत संवेदनशील असलेली व अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या अडसरे खुर्द ग्रुप ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच होण्याचा बहुमान परिवर्तन पॅनलच्या श्री काळू रावजी साबळे यांना मिळाला आहे.

अडसरे खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत प्रगती पॅनल विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे गटाचे परिवर्तन पॅनल अशी दुरंगी लढत पाहायला मिळाली यात प्रगती पॅनेलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला तर परिवर्तन पॅनेलने सरपंच पदासह पाच जागांवर दणदणीत विजय मिळवत यश संपादन केले. यात जनतेतून थेट सरपंच पदी

सरपंच काळू रावजी साबळे यांची वर्णी लागली तर परिवर्तन पॅनलकडून उपसरपंच हिरामण लहानु भांगरे, ग्रामपंचायत सदस्य कमल भरत गवारी, शांताबाई दशरथ भांगरे, तर प्रगती पॅनलकडून वनिता महेश ढेंगळे, ज्ञानेश्वर परबत मोंढे, सुदाम यादव कवटे, सुनीता बाळू साबळे, आदी या निवडणुकीत निवडून आले.

उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवार ता.०१ दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत निवडणूक ग्रामसेविका तथा निवडणूक अधिकारी म्हणून उषा राठोड यांनी काम बघितले तर सरपंच काळू साबळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली.या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी हिरामण भांगरे व सुनीता साबळे असे दोन अर्ज आल्याने व यात हिरामण साबळे गटाचे बहुमत सिद्ध झाल्याने त्यांच्या बाजूने एक मताने बहुमत सिद्ध झाल्याने सदस्य हिरामण भांगरे यांची थेट उपसरपंच पदावर बहुमताने सार्थ निवड करण्यात आली.

दरम्यान गेल्या दहा वर्षांच्या कालखंडानंतर परिवर्तन पॅनेलने प्रगती पॅनेलचा पराभव करत प्रस्तापितांना धूळ चारत सरपंच पदासह उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.दरम्यान उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, बहू मतातील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय आवारात गुलालाची उधळण करत एकच जल्लोष करत नवनिर्वाचित पदाधिकारी वर्गाला पुष्पहार घालत विजयोत्सव साजरा केला.सर्वांनी आनंदात ग्रामदैवत माता वरसु आई च्या जय घोषात आनंद साजरा केला.

प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या प्रगती पॅनेलवर मात करत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा परिवर्तन पॅनेलकडून धुवा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यंदाची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच काहीशी अनुभवायला मिळाली यात जनशक्तीचा विजय झाला असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या परिवर्तन पॅनलसाठी मोलाचे सहकार्य म्हणून इंजिनिअर संपत मोंढे,सामाजिक कार्यकर्ते अशोक भारती, पोलीस पाटील साहेबराव गोसावी, शेतकरी दौलत बांबळे,भास्कर गोसावी, विनायक चव्हाण, रमेश गोसावी, छगन गोसावी, शंकर साबळे, सुरेश भांगरे,संदीप साबळे, गणेश हंडोरे, भरत गवारी, मारुती गवारी, गोपीनाथ इरणक, संजय गिरंगे, विलास भांगरे, वसंत करके, मॅचिंद्र करके, सुरेश भांगरे, काळू भांगरे, बाळू कोंडूळे, रतन भोईर, मॅचिंद्र गोसावी, निवृत्ती इरणक, शंकर भांगरे, रतन भोईर, संदीप साबळे, त्र्यंबक गोसावी, तुकाराम गोसावी, दिलीप गोसावी आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया

“गावकऱ्यांनी मतातून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी आज सरपंच पदावर निवडून आलो.मतदार ग्रामस्थांचा विश्वास मी सर्वांना सोबत घेऊन एकीने गावातील विकास कामांतून सार्थकी लावील.”
श्री.काळू साबळे, नवनिर्वाचित सरपंच अडसरे खुर्द

___________

“सरपंच व सर्व सदस्यांमुळे मला उपसरपंच पद मिळाले,या पदावर कार्यरत असतांना जनतेने निवडणुकीत माझ्यावर दाखविलेला विश्वास मी गावातील विविध विकास कामांच्या माध्यमातून निश्चिंत सार्थकी लावील.प्रत्येक समाज घटकाला विश्वासात घेऊन उपेक्षित,गोरगरीबांचे वंचित प्रश्न कायमचे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असेल.”
– श्री.हिरामण भांगरे, नवनिर्वाचित उपसरपंच अडसरे खुर्द


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here