Abhishek Ghosalkar | काल रात्री साडे आठच्या सुमारास ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची चालू लाईव्हमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून, यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती.
यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ” ही गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर आहे. पण या घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही. तसेच या प्रकारामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे, असं म्हणणं देखील चुकीचं आहे. “तसेच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्याकांडाच्या या घटनेबाबत ते म्हणाले की, “राज्यातील एका तरुण नेत्याचं हे अशा पद्धतीने निधन होणं ही अतिशय गंभीर बाब आहे. तर, काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.(Abhishek Ghosalkar)
Abhishek Ghosalkar | चालू फेसबूक लाईव्ह मध्ये ठाकरेंच्या नगरसेवकाला घातल्या गोळ्या
तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत…
ही घटना गंभीर असून, ज्याने गोळ्या घातल्या त्या मॉरिस व अभिषेक घोसाळकर यांचे अनेक एकत्रित फोटो पहायला मिळाले आहे. वर्षानुवर्ष ते दोघे एकत्रित काम करत होते. तर, आता त्यांच्यात नेमकं कुठल्या विषयावरुन बेबनाव झाला हे पाहण महत्त्वाचं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. तसेच या प्रकरांच्या पोलीस तपासातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. योग्यवेळी ती संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल” असंही देवेंद्र फडणवीस हे यावली म्हणाले.(Abhishek Ghosalkar)
“गोळीबाराची घटना ही नक्कीच गंभीर बाब असून, या घटणेचं राजकारण करणं हे योग्य नाही. तसेच या प्रकारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे, असं म्हणणं देखील चुकीच असेल. कारण ही हत्या दोघांच्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडली आहे. तसेच बंदुकांचे लायसन्स देताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे? याचाही आता विचार सरकार नक्कीच करेल” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Kalyan | भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच शिंदेंच्या नगरसेवकावर झाडल्या गोळ्या
Abhishek Ghosalkar | गाडीखाली श्वान आला तरी….
विरोधी पक्षांकडून देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जात असून, याबाबत त्यांना प्रश्न केला असता. फडणवीस म्हणाले की, “हे पूर्णपणे राजकीय आरोप असू, विरोधी पक्षांची आताची स्थिती अशी आहे की, जर एखाद्या गाडीखाली श्वान जरी आला तरी, ते आमचा राजीनामा मागतील. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्यावरील ही गोळीबाराची घटना अत्यंत गंभीर असून, त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला आहे. तर मला याचं काही आश्चर्य वाटत नाही आहे. ही हात्या व्यक्तीगत वैमनस्यातून झालेली असून, विरोधी पक्ष हे त्यांचं काम करताय” असात टोला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.(Abhishek Ghosalkar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम