सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी (दि. ८) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती व दान पेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार इतक्या रकमेचा पोबारा केल्याचे उघडकीस आल्याने पुन्हा एकदा शहरवासीयांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एकदा देवळा पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर कोलथी नदी काठावर असलेल्या येथील देवळा शहर वासियांचे ग्रामदैवत दुर्गा माता मंदिराला लागून असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी (दि. ८) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दान पेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते आठ हजार रुपये व एक स्वामी समर्थांची मूर्ती चोरीस गेली आहे.
हा प्रकार आज शुक्रवारी (दि. ९) रोजी मंदिराचे सेवेकरी किशोर आहेर हे आपल्या नित्य नियमानुसार मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले. मंदिरात हा प्रकार घडल्याचे त्यांनी आपल्या इतर शिष्यांना
सांगितल्यावर त्यांनी मंदिराकडे धाव घेतली व घडलेला प्रकार पोलिसांना कळवला. दरम्यान, ह्या चोरटयांनी लागूनच असलेल्या दुर्गा माता मंदिरातील दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरल्याचे समजले.
देवळा शहरात वारंवार दुचाकी तसेच इतर छोट्या मोठ्या चोऱ्या होत असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरात घडलेल्या प्रकाराने नागरिकांनी आचर्य व्यक्त केले आहे. यामुळे देवळा पोलिसांसमोर देवळा शहरात तसेच तालुक्यातील खेड्या पाड्यात सतत घडत असलेल्या घटनांना आवर घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
Manoj Jarange | देवळा येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
देवळा येथील स्वामी समर्थ मंदिरात गेल्या महिन्यात दत्त जयंती उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने दान पेटीत जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये जमा झाल्याचा अंदाज सेवेकरी किशोर आहेर यांनी सांगितला असून, या दान पेटीची एक चावी दिंडोरी संस्थान कडे असते व एक आमच्याकडे असते. आज उद्या ही पेटी खोलून रिकामी करण्यात येणार होती. मात्र, त्या आधी अज्ञात चोरट्यानी दान पेटी फोडून त्यातील रकमेचा व मूर्तीचा पोबारा केल्याने खळबळ उडाली आहे. सेवेकऱ्यांनी या घटनेमुळे नाराजी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम