देशातून परतीचा मान्सून परतलेला आहे. आता पुन्हा देशावर चक्रीवादळाचे नविन संकट आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून या चक्रीवादळाचे नामकरण ‘तेज’ असं करण्यात आलेले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार? या संदर्भातील संपुर्ण माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे की,
अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ 26 ऑक्टोबरनंतर पुढे ओमानच्या दिशने वळणार आहे. हे चक्रीवादळ दक्षिण पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या चक्रीवादळचा कोणताच परिणाम होणार नाही, असं माणिकराव खुळे यांनी सांगितले.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र आज (दि. 21 ऑक्टोबर) शनिवारी तयार होणार आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ‘तेज’ हे चक्रीवादळ तयार होणार आहे. हे चक्रीवादळाची तीव्रता जास्त असणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमजवळ हे वादळ धडकणार आहे. त्यानंतर ‘तेज’ हे चक्रीवादळ ओडिशा आणि बांगालदेशच्या दिशेने जाईल. तसेच आंध्रप्रदेश आणि ओडिशाला ‘तेज’ या भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे.
Agriculture| सोयाबीन आणि मक्याचे दर ढासळले; शासकीय खरेदी सुरू नाहीच, शेतकरी वर्गात संतापाची लाट..
दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यात परतीच्या पावसाने काढता पाय घेताच तापमानाच्या पाऱ्यात वाढ दिसून आली आहे. यामुळे ‘ऑक्टोबर हिट’चा चटका महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना बसताना दिसत आहे. मात्र गेल्या चार दिवसात राज्यातील तापमानात सरासरी घसरण झाली असून राज्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसताना दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम