Political News | राज्यातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार असून मुंबईतील आझाद मैदानावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असला तरी दुसरीकडे महायुतीतील उपमुख्यमंत्रीपद व मुख्यमंत्री पदावरून पेच कायम असल्याचे चित्र आहे. त्यातच मुंबईमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांतील नेत्यांची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्री पदाचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे.
Political News | ‘ईव्हीएममध्ये घोटाळा शक्य!’; महादेव जानकरांच्या दाव्यामुळे खळबळ
गृहमंत्रीपदाचा तिढा सुटणार
सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळी दरेगावहुन मुंबईला परतले असून यानंतर आज युतीतील तीनही पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मुंबई येथे होणार असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी बद्दल चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदाच्या मागणीवरही चर्चा केली जाणार असल्याची ही माहिती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ गृहमंत्री पदावर ठाम असून भाजपकडून गृहमंत्री पद दिले जाणार नाही. असे स्पष्टपणे करण्यात आले आहे. ज्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून आजच्या युतीच्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
Political News | जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला; उदय सामंतांच्या सुचक विधानानं वेधलं लक्ष
भाजपाच्या बैठकी करता आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश
दरम्यान, आज भाजपची देखील बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीकरिता भाजपच्या अनेक आमदारांना मुंबई येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत मुंबईतील आमदारांना भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीकरिता निमंत्रण देण्यात आले आहे. तर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, बंटी भांगडीया हे सध्या मुंबईत असून नवनिर्वाचित आमदार करण देवताळे निरोप आल्यावर रवाना होणार असल्याची माहिती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम