Dada Bhuse | शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देवळा तालुक्यातील शाळांना अचानक भेट

0
34
Dada Bhuse
Dada Bhuse

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी देवळा येथील जि. प च्या विद्यानिकेतन, देवळा मुले तसेच मटाणे येथील शाळेला बुधवारी (दि. २२) रोजी अचानक भेट देत विद्यार्थ्यांना ‘सरप्राईज’ दिले. अचानक मंत्री शाळेत आल्याने शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे एका तासाहूनही अधिक वेळ त्यांनी पाहणी केली. यावेळी देवळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे आदी उपस्थित होते. तसेच देवळा विद्यानिकेतन येथे विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात विद्यार्थ्यांना शाळेतील सुविधा, शिक्षण याबद्दल विचारणा केली. यावेळी विद्यानिकेतन शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थी स्वरीत वरखेडे व पुष्कर जाधव यांना तुम्हाला शाळेत कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणकोणत्या सोयी सुविधा पाहिजेत याची त्यांनी स्वतः चौकशी केली.

मटाणे येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धत आणि शाळेच्या अडचणी त्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून समजून घेतल्या. शाळेला काही आवश्यकता असल्यास पत्र व्यवहार करण्याच्या सूचना यावेळी गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या. शाळेच्या वस्तीगृह, भंडारगृह, किचन शेड तसेच स्वच्छतागृहांना भेटी देत पाहणी केली. विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने यावेळेस शिक्षण मंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थीमधील चौकस बुद्धी व शालेय परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर देवळा गावातील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेसही शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची हजेरी व उपस्थिती पाहिली. ना. भुसे यांनी पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न मुलांना विचारले. मुलांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे वाचन घेतले.

Dada Bhuse | कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; दादा भुसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शालेय शिक्षण मंत्री बुधवारी कळवण दौऱ्यावर होते. रस्त्यावरून जात असताना त्यांनी देवळा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन व मुलींच्या शाळेला अचानक भेट दिली. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांकडून त्यांनी कविता म्हणून घेतल्या. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी देखील मंत्री भुसे यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. देवळा येथे आलेल्या पालकांना यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. तसेच जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळेमध्ये पाल्याला प्रवेश करावा. शाळांना मदत करा यासाठी पालकांना आग्रह केला. मंत्र्यांनी अशाच पद्धतीने भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता या ‘सरप्राइज’ भेटीच्या निमित्ताने घडू शकते असे पालकांनी यावेळी सांगितले.

दोघही शाळांच्या वतीने यावेळी मंत्रीमहोदय यांचा ‘बुके नको बुक द्या’ या उपक्रमानुसार पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अतुल पवार, सत्यम आहेर, दादाजी आहेर, आबा आहेर, विठोबा आहेर, भुरा आहेर, समाधान आहेर, ग्रामविकास अधिकारी अनिल आहेर आदींसह शिक्षक सुनील देवरे, उखा सावकार, प्रमोद अहिरराव, किरण पाटील, सुभाष शिंदे, अनुराधा शिंदे, आहेर, आंबेकर, मोनालि हिरे, ज्योती पगार, वंदना भामरे, अशोक सावंत उपस्थित होते. शिक्षकांना देखील यावेळी मंत्रिमहोदयांनी चांगले योगदान देण्यासंदर्भात सूचना केल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here