Ajit Pawar | विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती सरकार बहुमताने विजयी झाले. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याच्या चर्चांना उधाण आले असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत अग्रेसर आहेत. परंतु यामुळेच महायुतीत तणाव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे वक्तव्य केले. असून महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्मुला ठरलेला नाही. आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.” असे त्यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar | अजित पवारांच्या अडचणींत वाढ! कोर्टाकडून हजर राहण्याचे समन्स; नेमकं प्रकरण काय…?
नेमके काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्री पदाचा फॉर्मुला ठरलेला नसून पक्षातील आमदारांनी नेता पदी निवड केली. सर्व अधिकार दिले तसेच एकनाथ शिंदे यांची देखील त्यांच्या आमदारांनी येथे पदे निवड केली. भाजप मोठा पक्ष आहे ते त्यांचे ठरवतील. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही फॉर्मुला तयार झालेला नाही. यावर आता आम्ही एकत्र बसणार आहोत. वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत व स्थिर सरकार देऊ.” असे म्हटले आहे.
पुढे बोला, “27 तारखेचा राज्य स्थापन झाले पाहिजे असेही काही नाही. राष्ट्रपती राजवट लागू होईल. असेही काही होणार नाही निवडणूक आयोगाला सर्व निवडून आलेल्या आमदारांची माहिती दिली. विरोधी पक्ष नेते देखील निवडता येणार नाहीत. असे बहुमत मिळाले आहे. विरोधकांचा मान सन्मान ठेवला जाईल. सभागृह चालवताना सन्मान देणार महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकारी यांना विश्वासात घेऊ, अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊ केंद्रात व राज्यात एकच सरकार असल्याने सरकार मजबूत चालणार आहे.” असा विश्वास आहे त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुतणे युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर दिली प्रतिक्रिया
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांच्या पराभवावर देखील टिप्पणी केली आहे. हे योग्य नव्हते. असे अजित पवार यावेळी म्हणाले. लोकसभेला माझी चूक झाली. हे मी सांगून दमलो. पण घरातीलच लोकांनाच एकमेकांविरोधात उभा करणे हे योग्य नाही. माझ्या सख्खा भावाच्या मुलाला म्हणजेच, माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभा करण्याचे काहीच कारण नव्हते.” असेही अजित पवार यांनी म्हटले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम