Nashik Political | कळवणमध्ये घड्याळाने मारली बाजी; चौरंगी लढतीत गड राखत भाजप विजयी

0
52
#image_title

Nashik Political | विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी बऱ्याच मतदार संघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. सत्तेची चावी महायुतीच्याच हातात राहणार असून नाशिक जिल्ह्यात बहुतेक आमदारांनी पुन्हा एकदा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य, येवला, दिंडोरी, निफाड, देवळाली, इगतपुरी, नांदगाव, बागलाण व सिन्नर या मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी मिळाली असून अशातच आता कळवण व चांदवड मतदार संघातील निकाल हाती आला आहे.

Deola | देवळ्याच्या जनतेचा दादांना कौल; 52 हजार मतांनी राहुल आहेर आघाडीवर

नितीन पवारांकडून जे. पी. गावित यांचा पराभव

कळवण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पवार यांनी 1 लाख 19 हजार 181 मते मिळवत माकपच्या जे. पी. गावित यांचा पराभव केला आहे. तर जे. पी. गावित यांना 1 लाख 759 मते मिळाली आहेत. त्यामुळे पवार यांचा 8,432 मतांनी विजय झाला आहे. तर चांदवड मतदार संघातून भाजपचे डॉ. राहुल आहेर विजय झाले आहेत. आहेर यांना 1 लाख 4 हजार 3, प्रहारच्या गणेश निंबाळकर यांना 55 हजार 460, काँग्रेसच्या शिरीष कोतवाल यांना 23 हजार 9 व अपक्ष उमेदवार केदा आहेर यांना 48 हजार 422 मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल आहेर यांचा 48 हजार 422 मतांनी विजय झाला आहे. तर कळवण सुरगाणा येथे 117 विजयी उमेदवार असून नितीन अर्जुन पवार यांना 1 लाख 19 हजार 191 मते मिळाली आहेत.

Nashik Political | फरांदेंची हॅट्रिक, हिरेंनी बंडखोरांना चारली धुळ; नाशिकच्या तिन्ही मतदारसंघात कमळ फुलले!

पराभूत उमेदवारांना मिळालेली मते

बसपा – प्रभाकर पवार – 838

स्वराज्य पक्ष – भिका थोरात – 2230

अपक्ष – नितीन पवार – 1639

अपक्ष – बेबीलाल पालवी – 826

अपक्ष – प्रा.डॉ भागवत महाले 987

एकूण मतदार – 301996

झालेले मतदान – 236383

पुरुष मते – 123129

महिला मते – 113704

एकूण 78.43%


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here