Nashik Political | विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच नाशिक पश्चिम मधून मोठी बातमी समोर आली असून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी पश्चिम मतदार संघात मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन बदलल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत बडगुजरांनी हा आरोप केला आहे.
काय म्हणाले सुधाकर बडगुजर?
यावेळी बबोलताना, “7 बुथ यंत्रणेमधील 17 सीमेता तफावत आलेली आहे. छाननीच्या वेळेस दिलेले ईव्हीएमचे युनिट्स मग ते बॅलेट युनिट असेल, कंट्रोल युनिट असेल, व्हिप पॅड असेल याच्यामध्ये 17 सीमेत बदल आढळले आहेत. 125 च्या निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारती आहेत. त्यांनी असा बदल का केला? अशी शंका आमच्या मनात असून बदल करण्यामागचं कारण काय व उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधीला हे झालेले बदल का कळवले नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. “यावेळी निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित होत आहे. त्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं” अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
Nashik Political | ‘फरांदे-गीते’ पुन्हा आमने-सामने; पोलीसांच्या मध्यस्थीने परीस्थिती नियंत्रणात
ईव्हीएम मशीन बाहेरून स्कॅन केल्याचा आरोप
तसेच, “बूथ क्रमांक 221, 229, 174, 6, 191, 269, 306 या बूथ क्रमांकावर ईव्हीएम मशीन बदलण्यात आली असून बाहेरून आलेल्या ईव्हीएमचे ज्यावेळेस टेस्टिंग होते. त्यावेळेस उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी तिथे हजर असतो. पण अचानकपणे मतदान केंद्रावर आलेल्या या तांत्रिक मशिनरी याच्यामध्ये स्कॅनिंग करून जर बाहेरून आणलं तर ते काम हॅकर करू शकतो. बदल करू शकतो. म्हणजे दहा हजार मतांचा फरक पडू शकतो.” अशी शंका उपस्थित करत गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर, “आम्ही पत्र तयार करणार आहोत. ते पत्र त्यांना दिलं जाईल. त्यांनी याबाबत लेखी खुलासा करावा.” असे देखील म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम