Nashik Crime | सातपूर येथील गंगापूर रोड परिसरात उच्चभ्रू लोकवस्तीत पती व सासयरच्यांकडून विवाहीतेचा कौटुंबिक छळ करत पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पतीने पत्नीवर मानसिक व शारीरिक छळ करत बंदुकीच्या धाकावर आतापर्यंत सुमारे 75 लाख रुपये लुटल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्थानकात दाखल झाली असून पती आदित्य कासारसह सहकुटुंबीयांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Nashik Crime | पिंपळगावात टोलनाका परीसरात वाहन तपासणीदरम्यान, 69 लाखांची रोकड हस्तगत
2016 पासून सुरू होता छळ
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात उच्चभ्रू लोकवस्तीत राहणाऱ्या पीडितेने पती व त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक छळ करत पैसे उकाळल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, पती आदित्य कासार, सासरे पांडुरंग कासार, सासू जया कासार, नणंद गौरी कासार, नणंद सौ. शर्वरी कोतवाल, नंदोई तुषार कोतवाल या सर्वांकडून 2016 पासून पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. बंदुकीचा धाक दाखवून अनेकदा मारण्याची धमकी देत पैसे उकळण्यात आले. पीडितेचे वडील हयात नसल्याने तिला कोणाचाही आधार नव्हता. याचा गैरफायदा घेत पती व सासरकडच्यांनी पीडीतेला धमकावत आतापर्यंत सुमारे 75 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उकळली आहे. तसेच पीडितेचे सर्व दागिनेही काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नोंदविले आहे. फिर्याद नोंदवल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संस्था कलम 85, 316 (2), 115 (2), 351 (2), 352, 351, 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime | अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले!; पोलिस आयुक्तांकडून 737 व्यावसायिक तडीपार
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
पीडितेच्या फिर्यादीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून पीडितेचा पती हा सातपूर एमआयडीसी परिसरात हॉटेल चालवत आहे. सासरे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून सासू नाशिक मधील एका नामांकित शाळेची सेवानिवृत्त शिक्षिका आहे. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम