Nashik Political | नाशकात राजकिय वातावरण तापले; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस

0
65
#image_title

Nashik Political | निवडणुकीच्या प्रचाराकरिता आज उद्धव ठाकरे यांची तोफ नाशिकमध्ये धडाडणार आहे. शहरात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे गटात काही पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. परंतु त्याआधीच नाशिक पोलिसांकडून काही राजकीय पदाधिकाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आजच्या सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ही समावेश असल्याकारणाने उद्धव ठाकरेंच्या दौऱ्या निमित्ताने नाशकात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे.

Nashik Political | भाजपची बंडखोरांवर कारवाई; केदा आहेर आणि डॉ. आत्माराम कुंभार्डे निलंबित

शहर पोलीस प्रशासनाकडून राजकीय कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई

शहर पोलिसांकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून यांतर्गत 348 सराईत गुन्हेगारांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये भाजपसह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आज उद्धव ठाकरे यांच्या सभेत भाजप व वंचित बहुजन आघाडीतून विक्रम नागरे व पवन पवार ठाकरे गटात प्रवेश करणार होते. परंतु यांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली आहे. यातच काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असून परिस्थितीची चिघळली होती. भाजपचे आमदार राहूल ढिले व शरद पवार गटाच्या गणेश गीतांचे आमदार आमने-सामने आले होते व हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते.

Nashik Political | “आंबेडकरवादी जनता झिरवाळांसोबत”; रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारेंनी केले स्पष्ट

सुधाकर बडगुजरांचे प्रशासनावर गंभीर आरोप

तर ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर हद्दपारिची नोटीस लावण्यात आल्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी आता प्रशासनावर गंभीर आरोप करत, “निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे निवडणूक ही फेयर झाली पाहिजे. शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन दडपशाही करू पाहत आहे. प्रत्येक रॅलीत जर कोणी कार्यकर्ता दिसला तर त्याला तडीपारची नोटीस बजावायची किंवा त्याला बोलावून समज द्यायची. याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. ते आम्ही योग्य वेळी बाहेर काढू. ‘बडगुजर यांच्या प्रचाराला जायचे नाही.’ असे कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. पाच दिवस कुठेतरी निघून जा…नाहीतर तुला तडीपार करू…अशा धमक्या दिल्या जात आहेत. भाजपचे काही माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजताच तडीपारची नोटीस बजावली जाते. मात्र शिवसेना त्यांच्या पाठीशी असून त्यांना भक्कमपणे साथ देणार आहे. काळजीचे कारण नाही.” असे म्हणत प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here