Nashik Crime | इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षाच्या चिमुरडीचा सावत्र वडील व आजोबांकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून जन्मदात्या आईकडूनच मुलीला आजोबांजवळ झोपण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याविरुद्ध इंदिरानगर पोलीसात आईसह दुसरा पती व सासऱ्यांच्या विरोधात पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
आईकडून मुलीवर आजोबांजवळ झोपण्याची जबरदस्ती
पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पीडितेच्या आईसह घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा ताबा आईकडे होता. आईने दुसरा विवाह केला असून ते वडाळा परिसरात राहतात. दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने पीडित मुलगी वडिलांकडे आली असता तिने तिच्यासोबत होत असलेला प्रकार वडिलांना सांगितला. पीडीतेच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत आईने पिडितेच्या सावत्र आजोबांजवळ झोपण्याची जबरदस्ती केली. आजोबांनी त्यांच्याजवळ वारंवार ओढल्याने पिढीतेने त्यांच्या जवळ जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी आईने दमदाटी केली. तसेच पिडितेच्या सावत्र पित्याने देखील तिचा विनयभंग करून छळ केल्याचे उघडकीस आले.
Nashik Crime | नाशकात नाकाबंदीदरम्यान 33 लाख रुपयांची रक्कम जप्त
पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल
यानंतर पीडितेच्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांचा जबाब घेण्यात येणार जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम