Political News | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र दणाणून सोडला असून नेत्यांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप, टीका टिपण्या सुरूच आहेत. अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील मालेगाव येथील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांची सभा विरोधकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
समीर भुजबळांच्या सभेत विरोधकांचा हस्तक्षेप
समीर भुजबळ यांची सायंकाळी साकुरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही सभा सुरू असताना गावातील काही विरोधकांनी हस्तक्षेप करत ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याला न जुमानता समीर भुजबळ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यानंतर आपला प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे लक्षात घेत विरोधकांनी तिथून काढता पाय घेतला.
गावगुंडांच्या व आमदाराच्या दडपशाहीला कोणी घाबरू नये
यावेळी समीर भुजबळ यांनी, “विद्यमान आमदार हे विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आणि या विकास कामांमध्ये गावगुंडांना आणून सभा उधळवून लावण्याचा हे प्रयत्न करत आहेत. अशा गुंडगिरी आणि दडपशायला कोणी भीक घालू नका. विरोधकांना आता पराभव दिसू लागल्यामुळे असे प्रकार करत आहेत. त्यामुळे अशा गावगुंडांच्या व आमदाराच्या दडपशाहीला कोणी घाबरू नये. आपल्याला नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त करायचा आहे. ही गुंडगिरी आपण सर्व मिळून हद्दपार करूया.” असं म्हणत निर्धार व्यक्त केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम