Deola | गृहभेट मतदान प्रक्रियेअंतर्गत देवळा शहरात २५ पैकी २३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

0
34
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | गृहभेट मतदान अंतर्गत ८० वर्षांवरील वृद्धांसाठी चांदवड-देवळा विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेअंतर्गत आज शुक्रवारी दि. ८ रोजी देवळा शहरात २५ पैकी २३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एक मतदार नाशिक येथे उपचारासाठी गेला असल्याने तो घरी उपस्थित नव्हता तर एका मतदाराने मतदान करण्यास नकार दिला.

Deola | देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष स्व. अशोक आहेर यांच्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

40 टक्क्यांपेक्षा अपंग व ८० वर्षा पुढील वृद्धांना घरपोहच मतदानाची सुविधा 

वृद्धांच्या व अपंगांच्या घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यात आले. मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्ती व ८० वर्षा पुढील वृद्धांना मतदानासाठी मतदान करता यावे ह्या हेतूने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरपोहच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली.

Deola | खामखेडा येथे दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा सोळा वर्षांनी स्नेह मेळावा

देवळा शहरात २५ पैकी २३ मतदार होते

यात देवळा शहरात २५ पैकी २३ मतदार होते तर गुंजाळ नगर व विजय नगर येथे प्रत्येकी एक-एक मतदान होते. देवळा येथील पथकात नगरपंचायतिचे मुख्याधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी प्रमोद ढोरजकर, पीआरओ दीपक गावित, मिलिंद पालवे, प्रतीक अहिरे, सुनील गायकवाड, मुकेश कदम, कवलजित नगराळे, चंद्रकांत मोरडकर, स्वप्नील ठाकरे आदींनी काम पाहिले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here