Deola | देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष स्व. अशोक आहेर यांच्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

0
46
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील एकता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष स्व. अशोक देवराम आहेर यांचे चिरंजीव प्रतीक अशोक आहेर (३१) यांनी आपल्या निमगल्ली येथील राहऱ्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Deola | खामखेडा येथे दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा सोळा वर्षांनी स्नेह मेळावा

तीन दिवसांपूर्वी झाली होती घरफोडी

स्व. अशोक आहेर हे देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष होते. जि. परीषदच्या माजी सदस्या व माजी नगराध्यक्षा भारती आहेर यांचा प्रतीक हा मुलगा होता. गेल्या तीन दिवसापूर्वी त्यांच्या राहत्या घरी धाडसी घरफोडी झाली होती. त्यात दहा लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. त्यांनतर दोन दिवसांत अशी घटना घडली. त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Deola | देवळ्यातील मार्केट यार्ड परीसरात आढळला अनोळखी मृतदेह

देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

याबाबत देवळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रतीक याच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी अत्यंत शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत देवळा शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रतीक यांच्या पश्चात आई, पत्नी, एक बहीण, एक मुलगा असा परिवार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here