Nashik News | ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत झालेल्या बंडखोरीमुळे चर्चांना उधाण आले असून आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीतेंनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांनी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला या दोघांनीही आघाडी व युती यांच्या बंडखोरांना सामोरे जावे लागणार आहे.
आमदार गीतेंचे भाजपचे आमदारांवर गंभीर आरोप
या मतदारसंघात आता विद्यमान आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार गीते यांच्यात मुख्य लढत होणार असून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर माजी आमदार गीते यांनी सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आगामी काळात प्रचारात आरोप प्रत्यारोप होणार अशी चिन्हे आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार गीते यांनी “गेल्या दहा वर्षाच्या शहराच्या लोकप्रतिनिधींनी नाशिकची वाट लावली आहे. जनतेने आपल्या डोळ्याने पाहिले असून जनता आता या ‘बडी भाभीला’ धडा शिकवल्याखेरीस राहणार नाही. मी गेले तीन महिने शहरात फिरत आहे. आपले नाशिक हे सांस्कृतिक, धार्मिक व औद्योगिक शहर आहे. या शहराचे नेतृत्व करण्याची संधी या आमदारांना जनतेने दिली होती. परंतु या लोकप्रतिनिधींनी या विश्वासाला तडा दिला आहे.”
“ड्रग्सच्या व्यवसायाचे धागेद्वारे प्रामुख्याने नाशिक मध्य मतदारसंघात होते”
नाशिक शहरातील महाविद्यालये तरुण-तरुणी ड्रग्सच्या आहारी गेली असून सबंध युवा पिढी बरबाद करण्याचे काम ड्रग्सच्या माध्यमातून झाले. नव्या पिढीला हे लोक कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे आम्ही सहन करू शकत नाही. या लोकांनी शहरात एखादा कारखाना आणला नाही. परंतु ड्रग्सचा व्यवसाय कसा वाढेल, विस्तारेल यासाठी योगदान दिले आहे. या ड्रग्सच्या व्यवसायाचे धागेद्वारे प्रामुख्याने नाशिक मध्य मतदारसंघात होते.” असा गंभीर आरोप ही त्यांनी यावेळी केला आहे. “यांनी आरोपी असतील त्यांना जामिनावर सोडविणे त्यांना द्राक्ष पुरवठा करणे, विविध प्रकारची मदत करण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केल्याचे गंभीर आरोप केले असून या संबंध प्रकाराला आम्ही शहराच्या या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून मागील तीन महिने शहराच्या विविध भागात जाऊन मतदारांना भेटत आहोत. त्या जनतेने आता परिवर्तन करायचे असा ठोस निर्धार केलेला दिसतो. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आगामी निवडणुकीत शहराला बरबाद करणारे लोकप्रतिनिधींना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही.” असा निर्धार त्यांनी यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात चुरशीची लढत
नाशिक मध्य मतदारसंघात या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असून महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने बंडखोरी केली आहे. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरेंनी देखील बंडखोरी केली आहे. या निमित्ताने शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार गीते यांनी पुन्हा जुने आरोप उखडून काढले असून या निमित्ताने निवडणुकीतील मुद्दे काय याचा संदेश आता जनतेला गेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम