Nashik Politics | नाशकात महायुतीत बंडखोरी; राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

0
55
#image_title

Nashik Politics | विधानसभा निवडणुकीकरीता अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युती व आघाड्यांमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे दर्शनास आले असून महायुती व महाआघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांसमोर उमेदवार उभे करून त्यांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी बंडखोरी व मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

Nashik Politics | नाशकात उमेदवारी अर्ज भरण्याकरीता इच्छुकांची गर्दी; दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक इच्छूक

निवडणुकीच्या तोंडावर युतीत बंडखोरी

याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील देवळाली व दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांसमोर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवार उभे करत त्यांना एबी फॉर्म दिले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असून यात दिंडोरी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार धनराज महाले यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला आहे. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाले यांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडल्याची माहिती आता समोर आली आहे.

अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जला एकनाथ शिंदे पक्षाचा एबी फॉर्म

तर देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवार सरोज अहिरे यांच्या विरोधात नाशिकच्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आता अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जाला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

Nashik Politics | नांदगावात महायुतीला फटका; समीर भुजबळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

नाशिक मध्य मतदारसंघातही बंडखोरी

त्याचबरोबर, दोन्ही मतदार संघांसह नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाली असून या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे या मतदारसंघात देखील माहिती बंडखोरी झाली आहे तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे समीर भुजबळ यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे आता माघारीनंतरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here