Deola | देवळा जिजामाता कन्या विद्यालयात आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन

0
6
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींसाठी इको फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत जवळपास पाचशे विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवून आकाश कंदील बनवले.

Deola | विद्यमान आ. डॉ. राहुल आहेरांची चांदवड-देवळा मतदारसंघातून माघार; बंधू केदा अहेरांचा मार्ग मोकळा

इको फ्रेंडली आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणारे सुप्तगुण विकसित व्हावेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांच्यात कौशल्ये यावीत ते सर्वगुणसंपन्न असावेत हा हेतू साध्य करण्यासाठी विद्यालयात इको फ्रेंडली आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात कलाशिक्षक, चित्रकार भारत पवार यांनी इको फेंडली आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व याचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने पर्यावरण पूरक आकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले.

विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून माफक खर्चामध्ये व कमी वेळेत सुंदर व आकर्षक आकाश कंदील तयार केले व तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थी आपल्या स्वतःच्या घरावर दिवाळीच्या सणासाठी लावून हा दीपोत्सव साजरा करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्सहात कार्यशाळेत सहभागी झाले होते.

Deola | चणकापुर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी ९ कोटी ९९ लाख रु. निधीस शासनाची प्रशासकीय मंजुरी- आ. डॉ. राहुल आहेर

आकाश कंदीलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे

दीपावलीमध्ये घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदीलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आकाश कंदील आणि दिवाळी हे एक समीकरणच…स्वतःच्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. हे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतून अनुभवले. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, पर्यवेक्षक कौतिक खोंडे, ज्येष्ठ शिक्षक एस. टी. पाटील आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here