Nashik Crime | पोलीस आयुक्तांच्या व्हिडिओची छेडछाड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; सायबर पोलिसांकडून शोध सुरू

0
44
#image_title

Nashik Crime | नाशकात पोलीस आयुक्तांचा व्हिडिओ व्हाट्सअप वर व्हायरल करत दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा 24 सेकंदाचा व्हिडिओ व्हाट्सअप वर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी सायबर पोलीस संशयीतांचा शोध घेत आहे.

Nashik Crime | कौटुंबिक वादातून केलेल्या हत्येप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

पोलीस आयुक्तांच्या जुन्या व्हिडिओची छेडछाड

एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तात्कालीन पोलीस आयुक्त पांडेय यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा 4 मिनिटे 42 सेकंदातचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने छेडछाड करत व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये मुस्लिम धर्मियांच्या दिवसभरातील 5 वेळच्या अजानच्या 15 मिनिटांपूर्वी व 15 मिनिटांनंतर धार्मिक स्थळाच्या 100 मीटर अंतरावर वाद्य वाजवणे, हनुमान चालीसा पठण करण्यास बंदी असल्याचे या 24 सेकंदात दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ व्हायरल करून 2 धर्मांमध्ये असुरक्षिततेची व द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे करण्यात आला आला.

Nashik Crime | नाशकात पोलीस अधीक्षकाचा मुलावर प्राणघातक हल्ला; दिली जीवे मारण्याची धमकी

पोलिसांकडून नागरिकांना इशारा

यामुळे 2 धर्मात असुरक्षिततेची व द्वेशाची भावना संशयितांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे तो व्हिडिओ एडिट करणाऱ्यांसह फॉरवर्ड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून “नागरिकांनी हा व्हिडिओ कोणत्याही सोशल माध्यमांमध्ये व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here