Deola | देवळ्यातील मराठी शाळे जवळील दुकानांतून 91,800 रु. माल चोरट्यांनी केला लंपास

0
20
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | निंबोळा ता. देवळा येथील मराठी शाळेजवळ असलेल्या दुकानांमधून चोरी करून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.५) रोजी ९१ हजार ८०० रु. किमतीचा माल लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Deola | देवळ्यात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी कुंदन शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि.५) रोजिच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी निंबोळा ता. देवळा येथील मराठी शाळेजवळ असलेल्या शिवतांडव जनरल स्टोअर्सचा कडीकोंयका तोडून दुकानात प्रवेश केला आणि या दुकानाला लागून असलेल्या शेजारच्या हॉटेलमध्ये प्रवेश करत हॉटेल व दुकानातील रोख रक्कम व इतर वस्तू असे एकूण ४६ हजार ३०० रु. किमतीचा माल चोरून नेला.

Deola | दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराड यांची देवळा तालुका शाखेस भेट

तसेच अभिमन सावंत यांचे यश इलेक्ट्रिकल्स या दुकानाचाही पत्रा कापत तेथूनही ४५ हजार ५०० रु. किमतीची कॉपरची वायर असा एकूण ९१ हजार ८०० रु. किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. देवळा पोलिसांत या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here