Nashik Political | नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र; उत्तर महाराष्ट्रासाठी मनसेची रणनीती काय?

0
60

Nashik Political | राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रेदरम्यान नाशिकमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्र आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. “विधानसभेच्या तयारीला लागा..मी सांगेल तेव्हा मुंबईत या. महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराज उमेदवारांवर लक्ष ठेवा. राज्यामध्ये लवकरच मोठी राजकीय घडामोडी घडणार आहे.” या शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संकेत दिले असल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी किंवा रणनीतीबाबत यामध्ये फारशी स्पष्टता दिली नसल्याने बैठकीसाठी आलेल्या इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे.

Raj Thackeray | राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर

नवनिर्माण यात्रेचा उत्तर महाराष्ट्र दौरा

राज ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दोन दिवसीय दौरा शनिवार-रविवार या दोन दिवसात पार पडला असून दिनांक 6 ऑक्टोबर रोजी हॉटेल एस. एस. के. येथे दिवसभर पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे यांनी बैठक घेतली. या दरम्यान राज यांनी 5 ही जिल्ह्यांतील 47 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांकडून माहिती जाणून घेतली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी राज्यामध्ये निरीक्षकांची नेमणूक करून विधानसभा मतदारसंघनिहाय अहवाल मागवला होता. या आढावा बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघांच्या अहवालाची जिल्हा तसेच तालुकाध्यक्षांकडून पडताळणी केली गेली.

बैठकीला ‘यांनी’ दर्शवली उपस्थिती

त्याचबरोबर, उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आगामी काळात राज्यांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, बैठकीमुळे हॉटेल मार्गावर दिवसभर कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती. तसेच कालिका मंदिर मार्गावर यात्रोत्सव असल्याकारणाने वाहतुकीच्या कोंडीची समस्या उद्भवली होती. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, अनिल शिरोदे, नेते अविनाश अभ्यंकर, माजी महापौर अशोक मुर्तडकर, प्रदेशाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, लोकसभा समन्वयक ॲड. किशोर शिंदे, माजी नगरसेवक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे व माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बंडखोर उमेदवार गळाला लावणार

आगामी विधानसभा निवडणूक मनसेने स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले असले, तरी सक्षम आणि तुल्यबळ उमेदवार हा मनसे समोरील मोठा प्रश्न आहे. त्यातच इतर पक्षातील नाराजांवर मनसेचा डोळा असणार आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून इच्छुकांची मोठी यादी असल्याने बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा बंडखोर उमेदवारांना गळाला लावावे. असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Nashik Political | नाशकात भाजपला फटका; भाजप नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

पदाधिकाऱ्यांबरोबर बंद दाराआड चर्चा

यादरम्यान, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली असून माध्यमांशी न बोलताच ते मुंबईला निघून गेले. काही पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसेने नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि देवळाली या 4 ही जागेवर उमेदवार देणार असून या उमेदवारीचं दान कोणाच्या पदरात पडणार याबाबत इच्छुकांच्या मनात संभ्रम आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here