Nashik Political | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश बेर्डे यांनी अंतर्गत वादामुळे राजीनामा देत भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यानंतर, बेर्डे कोणत्या पक्षात जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. आता मात्र बेर्डे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून योगेश बेर्डे यांनी शिवसेनेचे उपनेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हा प्रवेश चर्चेचा विषय बनला आहे.
लोकसभेपासूनच होती नाराजी
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बेर्डे यांनी भाजपमध्ये तात्कालीन खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत डॉ. पवार यांच्या पराभवासाठी विरोधी पक्षाच्या प्रचारात सहभाग नोंदवत आपला भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. त्यानंतर बेर्डे दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर त्यांनी शिवसेनेचे उपनेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करत चर्चांवर पूर्णविराम लावला.
Nashik Political | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सीमा हिरे यांच्या कामांचे कौतुक
दिंडोरीमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष
यादरम्यान, लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, जिल्हा संघटक सतीश देशमुख, अॅड. विलास निरघुडे, जयराम डोखळे, प्रभाकर जाधव,सचिन बर्डे, अरुण गायकवाड, नीलेश शिंदे,गोटीराम बर्डे, गोविंद भालेराव, बाळू निसाळ, शरद बर्डे, सुनील पवार, श्रीराम आहेर, भगवंत बर्डे, केशव पाचोरकर, सुनील बोराटे, अभिषेक काकड, तनय उफाडे, नितीन हळदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. योगेश बेर्डे यांच्या या प्रवेशामुळे दिंडोरी तालुक्यात समर्थकांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम