Deola | नाशिक कृषी तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम यांचा सत्कार

0
20
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | गाव वाड्याच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असून, केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून निधी, अनुदानाचे वाटप करून लाभार्थ्यांना सहकार्य करा, असे आवाहन गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी केले.

Deola | देवळा अभिनव व जनता विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

गटविकास अधिकारी राजेश कदम यांचा सत्कार

येथील नाशिक जिल्हा कृषी तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देवळा पं.स.चे नूतन गटविकास अधिकारी राजेश कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश पगार, अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सचिव जयश्री आहेर आदी पदाधिकाऱ्यांसह पूनम सोनजे, राजश्री देसले, वैशाली येळीज, जयश्री निकम, अरुण पाटील, सरिता मिस्तरी, नूतन देवरे, रुपेश आहेर, स्वप्नील ठोके, वैभव खैरणार, राहुल सोनार, सुदर्शन बच्छाव, ठाकरे, विस्तार अधिकारी देवी प्रसाद मांडवडे, संधान उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here